केतकी चितळेला फेसबुक पोस्ट भोवणार, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

फेसबुक पोस्टमधून आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केतकी चितळे हिच्यावर रबाळे पोलीस ठाण्यात अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (atrocity - ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल झाला आहे.

केतकी चितळेला फेसबुक पोस्ट भोवणार, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
SHARES

अभिनेत्री केतकी चितळे (actress ketki chitale) हिला एक फेसबुक पोस्ट (facebook post) व्हायरल (viral) करणं चांगलंच महागात पडलं आहे. फेसबुक पोस्टमधून आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केतकी चितळे हिच्यावर रबाळे पोलीस ठाण्यात अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (atrocity - ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल झाला आहे. नवी मुंबईतील आंबेडकरी चळवळीतील युवा कार्यकर्ते स्वप्निल गोविंद जगताप यांनी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.

केतकीने १ मार्चला फेसबुकवर (facebook post) एक पोस्ट (post) टाकली होती. या पोस्टमध्ये केतकीने म्हटलं होतं की,  नवबौद्ध, ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क. आम्ही फक्त हिंदू, असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी!? पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो. 


ब्राह्मण द्वेष, किंवा ब्राह्मण कसे श्रेष्ठ, यातच आम्ही इतके गुंतलो आहोत, की 'मुसलमान, ख्रिश्चन मिळून या ब्राह्मणांना हकलवून लावू असं ही म्हणतो. आपण तर आपल्या महापुरुषांनाही नाही सोडलं हो! आपण तर त्यांचीही वाटणी केली. छत्रपती शिवाजी महाराज आमचे आणि सावरकर तुमचे, आंबेडकर फक्त नवबौद्धांचे! आपली लायकी आपणच काढली, आणि अजूनही काढतोय' असंही केतकीने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. केतकीच्या या पोस्टवर अनेकांनी जणांनी आक्षेप घेतला आहे. 



हेही वाचा -

'सूर्यवंशी'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित, अक्षयला सिंगम आणि सिम्बाची साथ

उड्डाणपुलाला शिवसेनाप्रमुखांचं नाव देण्यास पालिकेचा नकार




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा