Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,54,508
Recovered:
56,99,983
Deaths:
1,16,674
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,860
684
Maharashtra
1,34,747
9,798

'सूर्यवंशी'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित, अक्षयला सिंगम आणि सिम्बाची साथ

चित्रपटात प्रेक्षकांना अक्षय कुमार, सिंगम अजय देवगन आणि सिम्बा म्हणजे रणबीर सिंग असा ट्रिपल धमाका पाहायला मिळणार आहे.

'सूर्यवंशी'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित, अक्षयला सिंगम आणि सिम्बाची साथ
SHARES

रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनात बनलेला अक्षय कुमार (Akshay Kumar) स्टारर कॉप ड्रामा 'सूर्यवंशी'चा (Sooryavanshi trailer) ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. जबरदस्त अॅक्शन पाहण्याची संधी पुन्हा एकदा प्रेक्षकांना मिळाली आहे. रोहित शेट्टी (Rohit Shetty) दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेत्री कतरिना कैफ देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात प्रेक्षकांना अक्षय कुमार, सिंगम अजय देवगन (Ajay Devgn)आणि सिम्बा म्हणजे रणबीर सिंग (Ranveer Singh) असा ट्रिपल धमाका पाहायला मिळणार आहे


डीसीपी वीर सूर्यवंशी रिपोर्टिंग

सूर्यवंशी’ या चित्रपटात अक्षय कुमार एटीएस प्रमुखाच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षय कुमार सह चित्रपटाच्या अन्य कलाकारांनीही आपल्या सोशल अकाउंटवरुन हा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. इतकच नव्हे तर अक्षयनं हा ट्रेलर पोस्ट करत त्याखाली "डीसीपी वीर सूर्यवंशी रिपोर्टिंग लाइव." असं लिहिलं आहे.


'या' डायलॉगमुळे पोलिसांवर टीका

'मुंबई हिंदुस्तान का दिल...' या अजय देवगणच्या आवाजातील वाक्यानं 'सूर्यवंशी'च्या ट्रेलरची सुरूवात होते. त्यानंतर चित्रपटाच्या हिरोची दमदार एंट्री होते. 'मुंबई पोलीस पासपोर्ट पे Religion देखके गोली नहीं चलाती', हा ‘खिलाडी’ कुमारचा डायलॉग अनेकांच्या नजरेत आला आहे. यावरून यूट्यूबवर तर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. 'मुंबई पोलीस पासपोर्ट पे Religion देखके गोली नहीं चलाती', या डायलॉगवर एकानं कमेंट दिली आहे की, दिल्ली पोलीस गोली चलाती है. 


कधी होणार प्रदर्शित?

रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि अक्षयकुमार आणि कतरिना कैफ यांची प्रमुख भूमिका असलेला ‘सूर्यवंशी’ चित्रपट २४ मार्चला म्हणजेच मंगळवारी संध्याकाळी प्रदर्शित होणार आहे. बुधवारी म्हणजेच २५ मार्चला गुढीपाडव्याची सुट्टी आहे. मराठी नूतन वर्षाच्या आदल्या दिवशी चित्रपट प्रदर्शित करून प्रेक्षकांसाठी ‘लाँग वीकेंड’ तयार करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.


नाईट लाईफचा फायदा

आता तर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी ‘नाईट लाईफ’ योजनेचा ‘पहिला लाभार्थी’ ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट ठरणार आहे. मुंबईतील थिएटर येत्या २४ मार्चपासून २४ तास सुरु राहणार आहेत. त्यामुळे मुंबईकर प्रेक्षक दिवसाच्या कुठल्याही प्रहरी सूर्यवंशी चित्रपटाचा खेळ पाहू शकणार (Sooryavanshi Movie Night Life) आहेत.

चित्रपटात अक्षय, अजय आणि रणबीर या त्रिकुटासोबत गुलशन ग्रोवर, अभिमन्यु सिंह, जॅकी श्रॉफ आणि विवियन भटेना यांच्या देखील मुख्य भूमिका आहेत.


टिझरचं हटके मोर्केटिंग

काही दिवसांपूर्वी सूर्यवंशी चित्रपटाचा टिझर लाँच करण्यात आला होता. त्यावरून कळून येतं की चित्रपटाचं चांगल्याप्रकारे मार्केटिंग करण्यात येत आहे. सिनेमाच्या टीझरमध्ये लहान मुलांचा उत्तम वापर केला आहे. ‘सूर्यवंशी’च्या टीझरमध्ये अजय देवगण आणि रणवीर सिंह या दोघांचंही दर्शन घडतं. रोहित शेट्टीनं इन्स्टाग्राम, तर अक्षयकुमारनं ट्विटरवरुन हा टीझर शेअर केला होताहेही वाचा

टायगर श्रॉफचा अॅक्शन धमाका, 'हीरोपंती २'ची घोषणा

मुंबईत रंगणार आशियाई चित्रपट महोत्सव

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा