Advertisement

टायगर श्रॉफचा अॅक्शन धमाका, 'हीरोपंती २'ची घोषणा

'बागी 3’ (Baaghi 3) या चित्रपटानंतर टायगर श्रॉफ आणखी एक चित्रपट घेऊन येत आहे. बागी नंतर आता हिरोपती २ (Heropanti 2) चित्रपटात त्याचा अॅक्शन धमाका पाहायला मिळणार आहे.

टायगर श्रॉफचा अॅक्शन धमाका, 'हीरोपंती २'ची घोषणा
SHARES

टायगर श्रॉफ (Tiger Shroff)नं मागच्या वर्षी 'वॉर' या ब्लॉकबस्टर अ‍ॅक्शन चित्रपटानंतर यंदा 'बागी 3’ (Baaghi 3) हा नवा अ‍ॅक्शन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. हा सिनेमा रिलीज होण्यासाठी अवघे काही दिवस उरले असतानाच टायगरनं त्याच्या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. या सिनेमानंतर टायगर लवकरच त्याचा हिरोपंती २ (Heropanti 2) प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. या सिनेमाचं पोस्टर नुकतंच रिलीज झालं.

टायगर श्रॉफनं त्याच्या इन्स्टाग्रामवर या सिनेमाचा पहिला लुक शेअर केला आहे. ज्यात तो बंदुकांच्या मधून सूटा-बूटात पाहायला मिळत आहे. या पोस्टर्ससोबतच या सिनेमाची रिलीज डेटही समोर आली आहे. 'हिरोपंती २' हा सिनेमा पुढच्या वर्षी म्हणजे १६ जुलै २०२१ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २०१४ मध्ये टायगरनं हिरोपंती या चित्रपटातून कृति सेननसोबत बॉलिवूड पदार्पण केलं होतं. त्याचाच हा दुसरा भाग आहे.

'हिरोपंती २' बद्दल बोलायचं तर ‘द वर्ल्ड वॉन्टेड हिम डेड’ अशी या सिनेमाची टॅग लाइन आहे. म्हणजे पूर्ण जग त्याला मेलेलं पाहू इच्छिते. म्हणजे या सिनेमात तो संपूर्ण जगाशी लढताना दिसणार आहे. मात्र या सिनेमात कोणती अभिनेत्री दिसणार हे स्पष्ट झालेलं नाही.


साजिद नाडियाडवाला यांनी टायगर आणि क्रिती सॅनॉन ही झोडी 'हिरोपंती' मधून बॉलीवूडला दिली. टायगर आणि क्रिती या दोघांची जोडी प्रेक्षकांच्या चांगली पसंतीस उतरली होती. चित्रपटातील टायगरच्या अॅक्शननं संर्वांची मनं जिंकली. बॉक्स ऑफिसवर देखील चित्रपट हिट ठरला. दोघांचाही हा पहिला चित्रपट होता. आता या चित्रपटाचा आणखी एक भाग पाहायला मिळणार आहे.  

'हिरोपंती २' या सिनेमाचं दिग्दर्शन अहमद खान करत आहेत. टायगरच्या 'बागी ३'चं दिग्दर्शनही अहमद खान यांनीच केलं आहे. 'बागी ३'मध्ये टायगर आणि श्रद्धा कापूरची जोडी पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. या सिनेमात तो सीरियात अडकलेल्या भावाला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे


हेही वाचा

बॉलिवूडमध्ये #MeToo चळवळ सुरु करणाऱ्या तनुश्रीचं कमबॅक

अजयनं असं काय केलं जे टीव्ही अभिनेत्री बोलली, "पोलिसांवर विश्वास राहिला नाही"


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement