बॉलिवूडमध्ये #MeToo चळवळ सुरू करणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता आता पुन्हा स्टेजवर परतली आहे. तनुश्रीनं महाशिवरात्रीच्या निमित्तानं राजस्थानच्या प्रतापगड इथं एका कार्यक्रमात डांस केला. त्याची छायाचित्रं आणि व्हिडिओ तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये ती चित्रपटातील गाण्यांवर परफॉर्म करताना दिसत आहे.
तनुश्रीनं पोस्टमध्ये इतके दिवस स्टेजपासून दूर राहण्याचं कारणही शेअर केलं आहे. तिनं लिहलं आहे की, "महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर बर्याच दिवसानंतर स्टेजवर आज रात्री परफॉर्म करणार आहे. २०१६ मध्ये अमेरिकेत जाण्यापूर्वी माझे पाय फ्रॅक्चर झाले होते. यामुळे काही दिवस चालण्यासाठी मला कुबड्यांचा आधार घ्यावा लागला होता. जेव्हा मी अमेरिकेत गेले तेव्हा मी व्हीलचेअरवर होते. हे खरोखर कठीण होतं औपचारिकता पूर्ण करण्यासाठी मला तुटलेल्या पायांनी इकडे तिकडे पळावे लागले हे खूप वेदनादायक होते. पण देवाच्या कृपेनं मी यशस्वी झाले. म्हणूनच मला डान्सिंगपासून ब्रेक घ्यावा लागला होता. पण आता पाय चांगला झाला आहे. म्हणून मी स्टेजवर परतण्यासाठी तयार आहे."
तनुश्री दत्तानं तिच्याबरोबर 'होर्न ओके प्लीज' या गाण्याच्या शूटिंग दरम्यान लैंगिक शोषणाची कहाणी सांगितली होती. तिनं नाना पाटेकर, गणेश आचार्य यांच्यासह चार जणांवर आरोप केले होते. यानंतर #MeToo च्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये अनेक खुलासे झाले होते. परंतु, पुराव्याअभावी नानाच्या प्रकरणाची फाईल बंद झाली आहे.
हेही वाचा