Advertisement

मुंबईत रंगणार आशियाई चित्रपट महोत्सव

तुम्हाला देखील या फेस्टिव्हलचा आनंद लुटायचा असेल तर रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे.

मुंबईत रंगणार आशियाई चित्रपट महोत्सव
SHARES

१८व्या आशियाई चित्रपट महोत्सवाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहेयेत्या रविवारी १ मार्चला आशियाई चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. तुम्हाला देखील या फेस्टिव्हलचा आनंद लुटायचा असेल तर रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. प्रभादेवीमधल्या रवींद्र नाट्य मंदिर इथं बुकिंग ऑफिसमध्ये दुपारी २ ते रात्री ८ या वेळेत रजिस्ट्रेशन करू शकता.


महोत्सवाचे वैशिष्ट्य

यंदाच्या महोत्सवाचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे ६ आशियाई महिला दिग्दर्शकांच्या सिनेमांची स्पर्धा महोत्सवात असेल. अनुमिता दास दिग्दर्शित 'फ्लोज फॉर एव्हर'- बोहोमन ,सुमित्रा भावे  दिग्दर्शित 'दिठी', शिल्पा शुक्ला दिग्दर्शित स्टोरीज @, लाइ क्सुई दिग्दर्शित  'द टेस्ट फ्रॉम ए हॅपीआयलंड', अपराजिता घोष  दिग्दर्शित 'मिस्टिक मेमॉइर',लीना मणिमेकलाइ दिग्दर्शित 'अॅन अनफेरीटेलहे सहा चित्रपट स्पर्धेत असतील 


'या' मान्यवरांची उपस्थिती

स्पर्धेसाठी दिग्दर्शक रघुवीर कुल,स्त्री मुक्ति संघटनेच्या नेत्या छाया दातार आणि  ज्येष्ठ चित्रपट समीक्षक रेखा  देशपांडे आदी मान्यवर ज्यूरी म्हणून काम पाहणार आहेत. या स्पर्धेचे परितोषिक रोख रक्कमेचे असेल.


'यांचा' होणार खास सत्कार

 उद्घाटन सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे 'पाणी' चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल दिग्दर्शक आदिनाथ कोठारे आणि गोव्याच्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'माईघाट' चित्रपटाची नायिका उषा जाधव यांना आंतरराष्ट्रीय ज्युरींनी उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार दिला याबद्दल त्यांचा सत्कार केला जाणार आहे.


आंतरराष्ट्रीय चित्रपटांची मेजवानी

महोत्सवात अंतरराष्ट्रीय सिनेमांमध्ये इराण,  नेपाळ, चायना, कुर्दिस्तान, बांगलादेश, सिंगापूर, कोरिया, भूतान, इस्राइल, कझाकीस्थान, श्रीलंका तसंच राष्ट्रीय सिनेमांमध्ये बंगाली, मराठी, मणिपुरी, कश्मिरी, मल्याळम, असामी, तेलगु, कन्नड, पंजाबी, हिंदी भाषिक चित्रपट पाहायला मिळणार आहेत. यात एकूण ४२ चित्रपट आणि २६ लघुपटांचा समावेश आहे.


कधी आहे महोत्सव

१ मार्च ते ६ मार्च या कालावधीत प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिर, मिनी थिएटर इथं हा महोत्सव होणार आहे.  या महोत्सवात  १ तारखेपासून रोज सहा चित्रपट दाखवले जातील.



हेही वाचा

'एबी आणि सीडी' चित्रपटाचा टिझर प्रदर्शित, अमिताभ यांचा पहिला मराठी चित्रपट

बॉलिवूडमध्ये #MeToo चळवळ सुरु करणाऱ्या तनुश्रीचं कमबॅक

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा