एसटी महामंडळातील 'इतके' कर्मचारी कोरोनाबाधित

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना (essential workers) वाहतूक सेवा पुरविणाऱ्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना कोरोनानं चांगलंच टार्गेट केलं आहे. राज्यात एसटीतील बाधित कर्मचाऱ्यांची संख्या २ हजारांवर गेल्याची माहिती समोर येत आहे. तसंच यापैकी ३२९ कर्मचारी गेल्या अवघ्या १२ दिवसांत बाधित झाले आहेत.

एसटीतील (msrtc) मृत कर्मचाऱ्यांची संख्याही ६७ पर्यंत पोहोचली आहे. एसटी महामंडळाचे ३० सप्टेंबपर्यंत १ हजार ६७९ कर्मचारी कोरोनाबाधित होते, तर ५३ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. परंतु, आता गेल्या १२ दिवसांत वाढ झाली आहे. जून महिन्यापासून एसटीची सेवा हळूहळू विस्तारते आहे.

सध्यस्थितीत ग्रामीण भागातही एसटीची सेवा सुरू झाली असून जिल्ह्याबाहेरही सुरू करण्यात आली आणि एसटीचे चालक, वाहकांपासून सर्वच कर्मचारी पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले. त्यामुळे कर्तव्यावर असतानाही त्यांचा अनेकांशी संपर्क येऊ लागला. त्यामुळे कर्मचारी कोरोनाबाधितही होऊ लागले, तर काही कर्मचारी कर्तव्यावर नसताही करोनाबाधित झाल्याचं समजतं.

१३ ऑक्टोबपर्यंत कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांची संख्या २ हजार ०८ झाली आहे. यामध्ये मंगळवारी आणखी ३३ कर्मचारी बाधित झाल्याची नोंद झाली आहे. एकू ण १ हजार ५३५ कर्मचारी कोरोनामुक्त झाले असून ४०६ कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत.


हेही वाचा -

NDRF आणि NSSचं कोरोनाव्हारस विरोधात जनजागृती अभियान

MPSC ची नोव्हेंबरमधील परीक्षाही पुढे ढकलली


पुढील बातमी
इतर बातम्या