एसटीमध्ये आता जीपीएस यंत्रणा, प्रवाशांना कळणार निश्चित वेळ

एसटीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. कारण, आता लवकरचं ओला-उबेरप्रमाणं 'एसटी'मध्ये ही ‘जीपीएस’ यंत्रणा बसवण्यात येणार आहे. त्यामुळं प्रवाशांना एसटी नेमकी कुठे आहे? हे समजण्यात मदत होणार आहे. तसंच, प्रवाशांकरीता एसटी स्थानकांकर डिजिटल बोर्ड लावण्यात येणार असून, या बोर्डवर एसटीची निश्चित वेळ समजणार आहे. त्याशिवाय मोबाईल अॅपच्या माध्यमातूनही एसटी कुठे आहे? हे समजणार आहे.

उपक्रमासाठी कोटींची तरतूद

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसमधून राज्यभरातील अनेक प्रवासी प्रवास करतात. त्यामुळं या प्रवाशांना एसटीची निश्चित वेळ आणि ठिकाण कळणं गरजेचं असतं. यासाठी या जीपीएस यंत्रणेचा वापर करण्यात येत आहे. तसंच, येत्या सहा महिन्यांत राज्यभरात ही यंत्रणा कार्यन्वित करण्यात येणार आहे. दरम्यान या उपक्रमासाठी महामंडळानं ३५ कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

जीपीएस यंत्रणेचा फायदा

या यंत्रणेर्तंगत एसटीच्या सर्व थांब्यांवर डिजिटल फलक लावण्यात येणार आहेत. त्यामुळं प्रवाशांना एसटीची वेळ पाहता येणार आहे. तसंच, एसटी चालकानं एखादा स्टॉप चुकवला तर त्याचीही माहिती प्रशासनाला कळणार आहे. त्याचप्रमाणं, मोबाइलवर प्रवाशांना एसटी बसचं निश्चित ठिकाण समजणार आहे. चालक किती वेगानं एसटी चालवतो आहे, हे देखील याद्वारे समजणार आहे.


हेही वाचा

एसटीच्या चालक-वाहक पदासाठी ४२ हजार अर्ज दाखल

देशभरातील पेट्रोल पंपं सायंकाळी २० मिनिटं बंद राहणार


पुढील बातमी
इतर बातम्या