Advertisement

देशभरातील पेट्रोल पंपं सायंकाळी २० मिनिटं बंद राहणार

भारतीय सैन्याप्रती असलेली कृतज्ञता आणि एकजुटीचे दर्शवण्यासाठी (सीआयपीडी) आणि शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 20 मिनिटे पेट्रोलपंपावरील सर्व व्यवहार बंद ठेवले जाणार आहेत.

देशभरातील पेट्रोल पंपं सायंकाळी २० मिनिटं बंद राहणार
SHARES

पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली म्हणून देशभरातील पेट्रोलपंपावरील दिवे आज सायंकाळी 7 ते 7.20 दरम्यान बंद ठेवले जाणार आहेत. या वेळेत पेट्रोलपंपावर व्यवहारही बंद ठेवण्याचा निर्णय हा कन्सोटिंयम ऑफ इंडियन पेट्रोलियम डीलर्सनं (सीआयपीडी) घेतला आहे.

सीआयपीडी तर्फे शहिदांना श्रद्धांजली

पुलवामा इथं झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात ४० जवान शहीद झाले.त्यानंतर देशभरातून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. काही ठिकाणी दुकानं बंद ठेवून तर काही ठिकाणी नागरिकांनी रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध व्यक्त केला. भारतीय सैन्याप्रती असलेली कृतज्ञता आणि एकजुटी दर्शवण्यासाठी (सीआयपीडी) आणि शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 20 मिनिटं पेट्रोलपंपावरील सर्व व्यवहार बंद ठेवले जाणार आहेत. देशभरातील ५८ हजार पेट्रोलपंपावर हा बंद पाळण्यात येणार असल्यानं नागरिकांनी बंदच्या वेळेआधी किंवा नंतर पेट्रोल-डिझेल खरेदीसाठी यावं, असं आवाहन सीआयपीडीनं केलं आहे.



हेही वाचा

जवानांच्या छिन्नविछिन्न अवयवांचे फोटो शेअर करू नका : सीआरपीएफ


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा