Advertisement

जवानांच्या छिन्नविछिन्न अवयवांचे फोटो शेअर करू नका : सीआरपीएफ

शहिदांचा अपमान होत असल्यानं असे फोटो आणि पोस्ट शेअर करू नयेत, असं आवाहन सीआरएफनं केलं आहे.

जवानांच्या छिन्नविछिन्न अवयवांचे फोटो शेअर करू नका : सीआरपीएफ
SHARES

सीआरपीएफ जवानांवर पुलवामा इथं भीषण हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर जवानांच्या छिन्नविछिन्न अवयवांची चुकीचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. यामुळे शहिदांचा अपमान होत असल्यानं असे फोटो आणि पोस्ट शेअर करू नयेत, असं आवाहन सीआरपीएफनं केलं आहे.

सीआरपीएफ तर्फे एक अॅडव्हायजरी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये म्हटलंय की, पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर सोशल मीडियावर जवानांच्या छिन्नविछिन्न अवयवांचे बनावट फोटो व्हायरल होत आहेत. अशा पद्धतीची शहिदांचा अपमान करणारे फोटो व्हायरल केली जात असतील तर आपण एकत्र येऊन याचा विरोध केला पाहिजे. कृपया असे फोटो आणि पोस्ट फॉरवर्ड, शेअर किंवा लाईक करू नये. जर असं कुणी करत असेल तर त्याची तक्रार तुम्ही webpro@crpf.gov.in या साईटवर करू शकता.हेही वाचा

पाकिस्तानी कलाकारांसह कपड्यांनाही भारतात नो एन्ट्री : मनसे


संबंधित विषय
Advertisement