Advertisement

पाकिस्तानी कलाकारांसह कपड्यांनाही भारतात नो एन्ट्री : मनसे

मनसेनं पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकार आणि पाकिस्तानातून येणाऱ्या साहित्यांवर बंदी घालण्याचं आवाहन केलं आहे.

पाकिस्तानी कलाकारांसह कपड्यांनाही भारतात नो एन्ट्री : मनसे
SHARES

पुलवामा इथं भारतीय जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरात निदर्शनं करण्यात आली. या घटनेनंतर मनसेनं पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकार आणि पाकिस्तानातून येणाऱ्या साहित्यांवर बंदी घालण्याचं आवाहन केलं आहे.

ज्या चित्रपटात पाकिस्तानी कलाकार काम करतील ते चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नसल्याचा इशारा मनसेनं दिला आहेतर दुसरीकडे इंडियन फिल्म एंड टेलीविजन डायरेक्टर्स एसोसिएशन (आईएफटीडीए)मधील अनेक कलाकारांनी पाकिस्तानी कलाकारांसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला आहे.


हल्ल्याचा तिव्र निषेध

पुलवामा इथं झालेल्या भ्याड हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचं पुढे आलं. या घटनेनंतर देशभरात पाकिस्तानचा झेंडा जाळून निदर्शनं करत झालेल्या भ्याड हल्याचा निषेध करण्यात आला. या हल्यानंतर मनसेनं बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी कलाकार आणि पाकिस्तानातून येणाऱ्या कपड्यांवर आणि इतर वस्तूंवर बंदी घालण्याचं आवाहन केलं आहे.


... नाहीतर 'मनसे' खळखट्याक

चित्रपट निर्माता-दिग्दर्शकानं पाकिस्तानी कलाकारांना चित्रपटात काम दिलं तर रस्त्यावर उतरून आंदोलन तर करूच. शिवाय त्या निर्माता-दिग्दर्शकांचा कोणताही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नसल्याचा इशारा मनसेनं दिला आहे. तसंच मॉलमध्ये जो पाकिस्तानी साहित्यांची विक्री करेल त्याला मनसे स्टाईलनं उत्तर दिलं जाईल, असं मनसेच्या नेत्यांनी स्पष्ट केलं



हेही वाचा

राजकीय नेत्यांसह बॉलिवूड विश्वातून भ्याड हल्याचा निषेध


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा