'या' ५ राज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी विमानतळावर स्पेशल झोन

मुंबईत रेल्वे स्थानकांच्या बाहेर प्रवाश्यांसाठी स्क्रीनिंग सुरू केल्याच्या काही दिवसांनंतर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर २७ नोव्हेंबरपासून एक विशेष झोन (वेगळा विभाग) तयार करण्यात आला आहे. यामध्ये कोविडचा अहवाल न घेता विविध राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना स्क्रिनिंग होईपर्यंत ठेवण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या नियमांनुसार दिल्ली, गोवा, गुजरात आणि राजस्थान इथून येणाऱ्या प्रवाशांना विमानतळावर आगमन झाल्यानंतर आरटी-पीसीआर चाचणी घेणं आवश्यक आहे. विमानतळाबाहेर जाण्यापूर्वी प्रवाशांना बॅगच्या कॅरोलच्या जवळ असलेल्या चाचणी विभागात निर्देशित केलं जाऊ शकतं, असं विमानतळ प्राधिकरणानं सांगितलं.

विमानतळ अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, “महाराष्ट्र राज्याच्या आदेशाचं पालन करत दिल्ली, गोवा, गुजरात आणि राजस्थान इथून सीएसएमआयएला येणार्‍या प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणी देऊन ते पूर्णपणे बरे असल्याचा पुरावा द्यावा लागेल. मुंबई इथे आल्यावर चाचणी द्या आणि घरी जा.”

“२५ नोव्हेंबर २०२० रोजी नवीन निर्देशांची अंमलबजावणी झाल्यापासून सीएसएमआयएनं या पाच राज्यातून आलेल्या २०० हून अधिक प्रवाशांची चाचणी केली आहे. त्यापैकी कोणत्याच प्रवाशांची पॉझिटिव्ह चाचणी झाली नाही.”

अहवालानुसार निर्देशांच्या अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी घरी आगमन झालेल्या १२० प्रवाशांनी आरटी-पीसीआर चाचणी घेतली. विमानतळानं स्पष्ट केलं की, मुंबई विमानतळावरून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांनाच चाचणी अहवाल देणं आवश्यक आहे. तर मुंबई विमानतळावरून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्यांसाठी कोरोना चाचणी नाही.

दरम्यान, पहिल्या दिवशी महानगरपालिका हद्दीतील सहा बाहेरील रेल्वे स्थानकांवर एकूण ९ हजार ७७९ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १० प्रवाशांची तपासणी सकारात्मक झाली. अनिवार्य स्क्रिनिंगसाठी मुंबई रेल्वे स्थानकांमध्ये शेकडो प्रवासी लांबच लांब रांगा लागून उभे राहिले होते.


हेही वाचा

एसटीच्या स्मार्ट कार्ड योजनेला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

लहान मुलांसोबत लोकल प्रवास करण्यास महिलांना मनाई

पुढील बातमी
इतर बातम्या