Advertisement

लहान मुलांसोबत लोकल प्रवास करण्यास महिलांना मनाई

या परवानगीनंतर अनेक महिला आपल्या लहान मुलांनासोबत घेऊन लोकल प्रवास करत असल्याचं निदर्शनास आलं आहे.

लहान मुलांसोबत लोकल प्रवास करण्यास महिलांना मनाई
SHARES

मुंबईसह राज्यभरात लॉकडाऊन हळुहळू शिथिल होत असून राज्य सरकारनं अनलॉकच्या टप्प्यात राज्य सरकारनं मुंबई लोकलमधून महिलांना प्रवास करण्याची मूभा दिली. मात्र, या परवानगीनंतर अनेक महिला आपल्या लहान मुलांनासोबत घेऊन लोकल प्रवास करत असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळं कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षेसाठी आता लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्या महिलांना लोकल प्रवास करता येणार नाही, अशा स्पष्ट सूचना रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. 

मुंबई लोकलनं महिला प्रवासी लहान मुलांना आपल्यासोबत घेऊन आल्या तर त्यांना प्रवासाला परवानगी देण्यात येणार नाही, असं रेल्वे प्रशासनानं म्हटलं आहे. यानुसार आता मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्थानकावर आरसीएफ जवान तैनात असणार आहे. 

महिला प्रवाशासोबत लहान मुल आढळून आलं, तर त्या महिलेला प्रवासाची परवानगी मिळणार नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. मुंबईत लोकलमध्ये सध्या महिला प्रवाशांसह अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची मूभा आहे. १७ ऑक्टोबरपासून महिलांच्या प्रवासाला परवानगी मिळाली होती. पण त्यासाठी काही वेळा ठरवून देण्यात आल्या आहेत. महिलांना सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत आणि संध्याकाळी ७ नंतर पुढे शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा