आणखी वेगात धावणार राजधानी एक्सप्रेस!

मध्य रेल्वे मार्गावरील नाशिक मार्गे धावणाऱ्या मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसचा प्रवास आता आणखी वेगवान होणार आहे. वेळेची बचत करण्यासाठी २४ प्रवासी डब्यांसह ताशी १०० ते १४० किमी वेगाने धावण्याची क्षमता असलेले 'वॅप ७' हे आधुनिक इंजिन राजधानी एक्सप्रेसमध्ये पुश-पूल पद्धतीसाठी वापरण्यात येणार आहे. ही चाचणी यशस्वी ठरल्यास प्रवासी वेळेत एक ते दोन तासांची बचत होणार आहे.

पुश-पुल पद्धतीने चालणार एक्सप्रेस

रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन (आरडीएसओ) कडून मध्य रेल्वेला अंतिम वेगाचं यशस्वी प्रमाणपत्र मिळालं आहे. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मध्ये रेल्वेनं पुश-पुल पद्धतीनं राजधानी एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई-दिल्ली राजधानी एक्सप्रेस आठवड्यातील दोन दिवस धावते. त्यानुसार, बुधवारी राजधानी एक्स्प्रेस २० डब्यांसह रवाना करण्यात आली. एकूण चार चाचण्या यशस्वीपणे पार पडल्यावर राजधानी एक्सप्रेसचा वेग आणखी वाढवण्यात येणार आहे.

प्रवासासाठी अवधी घटणार

नाशिकमार्गे धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसला कसारा-इगतपुरी घाट मार्गावर बँकर जोडण्यासाठी आणि काढण्यासाठी वेळ लागतो. पुश-पुल पद्धतीमुळे हा अतिरिक्त वेळ कमी होणार आहे. त्यामुळे आपोआपच प्रवासासाठी लागणारा अवधीही घटेल.


हेही वाचा -

एसटीमध्ये ८,०२२ चालक-वाहक पदांची भरती

पुणे आणि नाशिक मार्गावर धावणारी लोकल मुंबईत दाखल


पुढील बातमी
इतर बातम्या