Advertisement

एसटीमध्ये ८,०२२ चालक-वाहक पदांची भरती

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा (एसटी)कडून ८,०२२ चालक आणि वाहकांची भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ही पदं राज्यातील दुष्काळग्रस्त भागांतील बेरोजगार तरूण-तरूणींसाठी असल्याने त्यांच्यासाठी ही मोठी दिलासादायक बाब आहे.

एसटीमध्ये ८,०२२ चालक-वाहक पदांची भरती
SHARES

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा (एसटी)कडून ८,०२२ चालक आणि वाहकांची भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ही पदं राज्यातील दुष्काळग्रस्त भागांतील बेरोजगार तरूण-तरूणींसाठी असल्याने त्यांच्यासाठी ही मोठी दिलासादायक बाब आहे.

या भरतीमध्ये आता हलकं वाहन चालविण्याचा एक वर्षाचा परवाना असलेल्या महिलांना अर्ज करता येणार आहे. भरती प्रक्रियेतून निवड झाल्यानंतर महिला उमेदवारांना एसटी महामंडळातर्फे अवजड वाहन चालविण्याचं प्रशिक्षणही देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे. त्याशिवाय महिलांना शारीरीक उंचीच्या अटीमध्ये सवलत देण्यात आली आहे. ही अट किमान १६० सेंमीवरुन १५३ सेंमी इतकी करण्यात आली आहे. पुरुष उमेदवारांसाठी अवजड वाहन चालविण्याच्या अनुभवाची अट शिथील करण्यात आली आहे. या अन्वये तीन वर्षांऐवजी एक वर्षाचा अनुभव असलेले पुरुष उमेदवारही अर्ज करु शकणार आहेत.


अर्ज करण्याची मुदतीत वाढ

८,०२२ चालक-वाहक पदांपैकी राज्यातील दुष्काळग्रस्त १२ जिल्ह्यांमधून ४,४१६ तर उर्वरीत जिल्ह्यांमधून ३,६०६ पदं भरली जाणार आहेत. आधीच्या नियोजनानुसार १२ दुष्काळग्रस्त जिल्ह्यांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ फेब्रुवारी होती. मात्र, या ही तारीख १५ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसंच, बाकीच्या जिल्ह्यांसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. त्याचप्रमाणं, या पदांसाठी २४ फेब्रुवारी रोजी संबंधीत जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी लेखी परिक्षा घेण्यात येणार आहे.


महिलांसाठी ३० टक्के जागा राखीव

सध्या सुरू असलेल्या भरतीमध्ये महिलांसाठी ३० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यासाठी आतापर्यंत २८९ महिला उमेदवारांनी अर्ज केला आहे. महामंडळाने अधिकाधिक महिला उमेदवारांना या भरती प्रक्रियेत स्थान देण्याच्या उद्देशाने काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. चालक तथा वाहक पदासाठी महिलांना अवजड वाहन चालविण्याचा परवाना असणं बंधनकारक होतं. मात्र ही अट रद्द करण्यात आली असून, परिक्षेअंती ज्या महिलांची निवड होईल त्यांना महामंडळामार्फत एक वर्ष अवजड वाहन चालविण्याचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षण कालावधीत त्यांना महामंडळामार्फत विद्यावेतनही देण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर महिला उमेदवारांना आरटीओकडून रितसर अवजड वाहन चालविण्याचा परवाना दिला जाईल. त्यानंतर या महिला एसटी बसेस चालवू शकतील, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली.



हेही वाचा -

मुंबईत तापमानाची रस्सीखेच, पारा १२ अंशावर

Movie Review : पुलंची 'भाई'गिरी अन् शब्द-सूरांची मैफल



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा