Advertisement

पुणे आणि नाशिक मार्गावर धावणारी लोकल मुंबईत दाखल

मुंबई-पुणे आणि मुंबई-नाशिक या मार्गावर लोकल चालवणं अवघड होतं. त्यामुळे या मार्गावर प्रवास करण्यासाठी एक्स्प्रेसनं प्रवास करावा लागतो. पण आता आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे.

पुणे आणि नाशिक मार्गावर धावणारी लोकल मुंबईत दाखल
SHARES

मुंबईहून पुणे आणि नाशिक लोकलनं प्रवास करणं आता लवकरचं शक्य होणार आहे. मुंबईहून नाशिक आणि पुणे प्रवासासाठी विशेष लोकल ट्रेन तयार करण्यात आल्या आहेत. चेन्नईच्या इंटिग्रेल कोच फॅक्टरीमध्ये ही लोकल बनवण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईहून पुणे आणि नाशिक असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लोकलनं प्रवास करता येणार आहे.


३२ ब्रेकची लोकल

मुंबई-पुणे आणि मुंबई-नाशिक या मार्गावर लोकल चालवणं अवघड होतं. कठीण चढउतार असलेल्या कसारा घाट आणि बोर घाटात मध्य रेल्वेकडील सध्याची लोकल चालवणं शक्य नव्हतं. त्यामुळे या मार्गावर प्रवास करण्यासाठी एक्स्प्रेसनं प्रवास करावा लागतो. तसंच, एक्स्प्रेसनं घाट चढण्यासाठी देखील बँकर इंजिनाची मदत घ्यावी लागते. त्यानुसार रेल्वेत काही विशेष बदल करण्यात आले आहेत. सामन्य लोकलला १६ ब्रेक असतात. या लोकलला ३२ ब्रेक देण्यात आले आहेत. या लोकलचे दरवाजे स्वयंचलित असतील.


लवकरच चाचणी

मुंबई-पुणे-नाशिक या मार्गावर धावणारी लोकल मुंबईत दाखल झाली आहे. त्याचप्रमाणे, मुंबईमध्ये दाखल झालेल्या या लोकलवर कारशेडमध्ये काही बदल आणि चाचण्या करण्यात येणार आहेत. या बदलांनंतर या लोकलची घाटात चाचणी घेण्यात येईल. लोकलची घाटातील चाचणी यशस्वी ठरल्यास प्रवाशांना या लोकलमधून थेट नाशिक, पुणे गाठता येणार आहे.



हेही वाचा -

परळ स्थानकानंतर जोगेश्वरी स्थानकात उभारणार टर्मिनस

सुरक्षित प्रवासासाठी रेल्वेगाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा