Advertisement

परळ स्थानकानंतर जोगेश्वरी स्थानकात उभारणार टर्मिनस

पश्चिम रेल्वे मार्गावर देखील लांब पल्ल्यांच्या गाड्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळं पश्चिम रेल्वेवरील टर्मिनसवर येणारा भार कमी करण्यासाठी जोगेश्वरी स्थानकात टर्मिनस उभारण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनातर्फे घेण्यात आला आहे. या निर्णयाला हंगामी अर्थसंकल्पातही मंजुरी मिळाली आहे.

परळ स्थानकानंतर जोगेश्वरी स्थानकात उभारणार टर्मिनस
SHARES

मध्य रेल्वे मार्गावरील रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या पाहता मध्य रेल्वेनं परळ स्थानक टर्मिनस करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळं दादर स्थानकातून सुटणाऱ्या एकूण ३२ गाड्यांमधील १६ गाड्या या परळ टर्मिनसहून सुटणार आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर देखील लांब पल्ल्यांच्या गाड्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळं पश्चिम रेल्वेवरील टर्मिनसवर येणारा भार कमी करण्यासाठी जोगेश्वरी स्थानकात टर्मिनस उभारण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनातर्फे घेण्यात आला आहे. या निर्णयाला हंगामी अर्थसंकल्पातही मंजुरी मिळाली आहे.


४२ पादचारी पुल

मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी परळ स्थानकात टर्मिनस उभारण्यात येत आहे. या टर्मिनसमुळे लोकल गाड्यांसह लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा वाढता भार कमी होणार आहे.

टर्मिनसप्रमाणे पश्चिम रेल्वे मार्गावर ४२ पादचारी पुल उभारण्यात येणार आहेत. या कामासाठी १०० कोटी ८७ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. त्याचप्रमाणं, मध्य रेल्वेवरील विविध स्थानकात पादचारी पुल उभारण्यात येणार असून या कामासाठी ८० कोटी रुपये खर्च येणार आहे.



हेही वाचा -

पश्चिम रेल्वेच्या ११ तासांच्या मेगाब्लॉकवेळी विशेष बस

जीएसबी मंडळ उभारणार सुसज्ज रुग्णालय



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा