पश्चिम रेल्वेच्या ११ तासांच्या मेगाब्लॉकवेळी विशेष बस

शनिवारी रात्री ९.३० ते रविवारी सकाळी ९ वाजेपर्यंत पश्चिम रेल्वे चर्चगेट ते दादर स्थानकापर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे चर्चगेट ते दादर स्थानकादरम्यान एकही लोकल धावणार नाही आहे. त्यामुळे प्रवाशांची गैर सोय होऊ नये यासाठी, या मार्गावर बेस्ट उपक्रमातर्फे जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत.

SHARE

लोअर परळ येथील डिलाईल रोड पूल पाडण्यासाठी पश्चिम रेल्वेतर्फे शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत ११ तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. शनिवारी रात्री ९.३० ते रविवारी सकाळी ९ वाजेपर्यंत पश्चिम रेल्वे चर्चगेट ते दादर स्थानकापर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे चर्चगेट ते दादर स्थानकादरम्यान एकही लोकल धावणार नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी या मार्गावर बेस्ट उपक्रमातर्फे जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. शनिवारी रात्री ९.३० ते मध्यरात्री १.२५ पर्यंत आणि रविवारी पहाटे ३.३० ते सकाळी १० वाजेपर्यंत विशेष बससेवा असणार अाहे. 


या मार्गावर 'विशेष बससेवा'

पश्चिम रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉकमुळे चर्चगेट ते दादर या मार्गावरील अहिल्याबाई होळकर चौक (चर्चगेट स्थानक पुर्व) – महर्षी कर्वे मार्ग पं. पलुस्कर चौक (चर्नी रोड) – डॉ. भडकमकर मार्ग (ग्रॅंट रोड) - डॉ. आनंदराव नायर (मुंबई सेंट्रल) – संत गाडगे महाराज चौक (महालक्ष्मी) - डॉ. ई मोजेस मार्ग – एच यू रखांगे चौक – सेनापती बापट मार्ग – कर्मवीर विठ्ठलराव वादक चौक (लोअर परेल) – परेल एसटी डेपो - सेनापती बापट मार्ग – शारदाश्रम विद्यालय – भवानी शंकर मार्ग – दादर कबुतर खाना - दादर स्थानक (प.) या मार्गावर विशेष बससेवा सोडण्यात येणार आहेत. 


दोन्ही आगारातून ३ बस

बेस्ट प्रशासनातर्फे या मार्गावर बॅकवे आगार आणि वरळी आगारातून प्रत्येकी ३ बस सोडण्यात येणार आहेत. तसंच या विशेष बसेससाठी वेगळं तिकीट प्रवाशांना देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणं रात्रीच्यावेळी प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी चर्चगेट स्थानकात बॅँकवे आगारामधील आणि दादर स्थानकात वरळी आगारातील वाहतूक अधिकारी व बस निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. हेही वाचा -

अर्रर्रर्र! वाॅटरटॅक्सीची प्रतिक्षा लांबली, तांत्रिक अडचणींचा फटका

लोअर परळ पुलाच्या पाडकामासाठी शनिवार-रविवारी २०५ लोकल फेऱ्या रद्दसंबंधित विषय
ताज्या बातम्या