Advertisement

लोअर परळ पुलाच्या पाडकामासाठी शनिवार-रविवारी २०५ लोकल फेऱ्या रद्द

पश्चिम रेल्वे मार्गावरील लोअर परळ पुलाच्या पाडकामासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवार आणि रविवारी ११ तसांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी, २ फेब्रुवारीला रात्री १० वाजल्यापासून ते रविवारी, ३ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजेपर्यंत असा हा ११ तासांचा मेगाब्लाॅक असणार आहे. तर या मेगाब्लाॅकसाठी पश्चिम रेल्वेकडून तब्बल २०५ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत

लोअर परळ पुलाच्या पाडकामासाठी शनिवार-रविवारी २०५ लोकल फेऱ्या रद्द
SHARES

पश्चिम रेल्वे मार्गावरील लोअर परळ पुलाच्या पाडकामासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवार आणि रविवारी ११ तसांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी, २ फेब्रुवारीला रात्री १० वाजल्यापासून ते रविवारी, ३ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजेपर्यंत असा हा ११ तासांचा मेगाब्लाॅक असणार आहे. तर या मेगाब्लाॅकसाठी पश्चिम रेल्वेकडून तब्बल २०५ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मेगाब्लाॅकदरम्यान चर्चगेट ते वांद्रे स्थानकादरम्यान धिम्या मार्गावर एकही लोकल धावणार नाही. तर चर्चगेट ते दादर स्थानकादरम्यान जलद मार्गावर एकही लोकल धावणार नाही. महत्त्वाचं म्हणजे या कामाचा परिणाम लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही होणार आहे. लांब पल्ल्याच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्या उशीरानं धावणार आहेत. त्यामुळे या ११ तासांच्या मेगाब्लाॅकमुळे प्रवाशांची थोडी गैरसोय होण्याची शक्यता आहे.


चर्चगेट ते दादर लोकल सेवा बंद

ब्लॉकदरम्यान सर्व अप धिम्या मार्गावरील लोकल वांद्रे स्थानकापर्यंत चालविण्यात येणार असून त्या वांद्रे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरून सुटणार आहेत. त्याचप्रमाणं सर्व अप जलद मार्गावरील लोकल दादर स्थानकापर्यंत चालविण्यात येणार असून त्या दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ आणि ५ वरून सुटणार आहेत. डहाणू, विरार ते दादरपर्यंत चालविण्यात येतील. तसंच, बोरीवली, भार्इंदर, विरार ते वांद्रेपर्यंत चालविण्यात येतील. त्याशिवाय अनेक लोकल आणि मेल, एक्स्प्रेस रद्द करण्यात येणार आहेत. तर काही लोकल आणि मेल, एक्स्प्रेसच्या वेळेत आणि मार्गात बदल करण्यात आला आहे.


अप धिम्या आणि अप जलद मार्गावरील शेवटची लोकल

  • शनिवारी रात्री शेवटची धिमी लोकल चर्चगेट येथून रात्री ९.३९ वाजता सुटणार आहे. ही लोकल रात्री १०.४६ वाजता बोरीवली स्थानकात पोहोचेल.
  • शेवटची जलद लोकल चर्चगेट येथून रात्री ९.४४ वाजता सुटणार आहे. ही लोकल रात्री ११.१० वाजता बोरीवली स्थानकात पोहोचेल.
  • बोरिवली स्थानकातून शेवटची धिमी लोकल रात्री ८.५६ वाजता सुटणार आहे. ही लोकल चर्चगेट स्थानकात रात्री १०.३ वाजता पोहोचेल.
  • विरार स्थानकातून शेवटची जलद लोकल रात्री ८.३५ वाजता सुटणार आहे. ही लोकल चर्चगेट स्थानकात रात्री ९.५७ वाजता पोहोचेल.


२ फेब्रुवारीला या गाड्या रद्द

  • मुंबई सेंट्रल - अहमदाबाद पॅसेजर
  • मुंबई सेंट्रल - इंदौर दुरोन्तो एक्स्प्रेस
  • मुंबई सेंट्रल - राजकोट दुरोन्तो एक्स्प्रेस
  • अहमदाबाद - मुंबई सेंट्रल पॅसेंजर
  • राजकोट - मुंबई सेंट्रल दुरोन्तो एक्स्प्रेस

३ फेब्रुवारीला या गाड्या रद्द

  • मुंबई सेंट्रल-अहमदाबाद गुजरात एक्स्प्रेस
  • मुंबई सेंट्रल - वलसाड फास्ट पॅसेंजर
  • वलसाड - मुंबई सेंट्रल फास्ट पॅसेंजर
  • अहमदाबाद - वलसाड गुजरात क्वीन एक्स्प्रेस
  • इंदौर-मुंबई सेंट्रल-दुरोन्तो एक्स्प्रेस


निश्चित वेळेपेक्षा जास्त अवधी लागण्याची शक्यता

लोअर परळ पुलाच्या पाडकामाला २ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. त्यावेळी संपूर्ण लोअर परळ पूल जमीनदोस्त करण्यात येणार आहे. पुलाच्या पाडकामावेळी अप-डाऊन धीम्या आणि जलद मार्गावरील ओव्हरहेड वायरमधील (ओएचई) वीज पुरवठा खंडित करण्यात येणार असून ओएचई खाली आणल्या जाणार आहेत. पुलाचा सांगडा संपूर्ण काढून येथील गर्डर काढण्याचे आणि टाकण्याचे काम युद्धपातळीवर केले जाणार आहे. पाडकाम ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत केले जाणार आहे. दरम्यान या पुलाच्या पाडकामासाठी निश्चित करण्यात आलेली वेळ कमी पडण्याची शक्यता असल्यानं ब्लॉकची वेळ वाढण्याची शक्याता वर्तवण्यात येत आहे.



हेही वाचा -

आयआयटी मुंबईनं तयार केली दांडीयात्रेची शिल्पाकृती

मुंबईकरांनो! शुक्रवारपासून उबर वाॅटरटॅक्सीनं अवघ्या २५ मिनिटांत पोहचा मांडव्याला



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा