मुंबईची जीवघेणी लाईफलाईन, जुलैपर्यंत लोकलगर्दीचे 406 बळी

  • राजश्री पतंगे & रुपाली शिंदे
  • परिवहन

मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरून धावणारी लोकल मुंबईची लाईफलाईन समजली जाते. मात्र हीच लाईफलाईन आता मुंबईकरांसाठी जीवघेणी ठरत आहे. सकाळी आणि संध्याकाळी लोकलला असणाऱ्या गर्दीमुळे प्रवासी दरवाजात लटकून प्रवास करतात. त्यामुळे लोकलमधून पडणाऱ्या प्रवाशांचं प्रमाण वाढलं आहे. आणि याच गर्दीमुळे जुलैपर्यंत 406 जणांचा बळी गेला आहे.

रेल्वेचे इतके बळी

रेल्वे पोलिस (जीआरपी)ने दिलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते जुलै या कालावधीत लोकलगर्दीचे 406 बळी गेले असून 871 जण गंभीर जखमी झाले आहेत. गेल्यावर्षी जुलैमध्ये लोकल ट्रेनमधून पडून 360 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर डिसेंबरपर्यंत 654 जणांचा बळी गेला होता.

फक्त यालाच मंजुरी

उपनगरीय रेल्वेमार्गावरील विविध प्रवासी संघटनांनी अभ्यास करून हे अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुचवल्या होत्या. यामध्ये 12 आणि 15 डब्यांचा रॅक, कॅब सिग्नलिंग या उपाययोजना सुरू करण्याची शिफारस होती. मात्र यामधील फक्त 12 आणि 15 डब्यांच्या रॅकला मंजुरी मिळाली आहे.

अभ्यासात असे आढळून आले आहे की, उपनगरीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या 2011 ते 2018 पर्यंत 6 दशलक्षांवरून 8 दशलक्षांवर गेली. परिणामी 12 डब्यांच्या रॅकची निर्मिती करण्यात आली.


हेही वाचा -

नालासोपारा रेल्वे ब्रिजवर महिलेने दिला बाळाला जन्म

हार्बर रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत, प्रवासी त्रस्त

पुढील बातमी
इतर बातम्या