Advertisement

नालासोपारा रेल्वे ब्रिजवर महिलेने दिला बाळाला जन्म

नालासोपारा पश्चिम येथील हनुमान नगर येथे राहणारी रेश्मा बेगम ही महिला गोरेगाव येथे जाण्यासाठी निघाली होती. दरम्यान रेल्वे स्थानकाच्या मधल्या ब्रिजवर पोहचताच तिला प्रसुती कळा सुरू झाल्या. रविवारी 9.15 वाजण्याच्या सुमारास तिने या रेल्वेच्या ब्रिजवरच एका गोंडस बाळाला जन्म दिला.

नालासोपारा रेल्वे ब्रिजवर महिलेने दिला बाळाला जन्म
SHARES

नालासोपारा रेल्वे स्थानकाच्या मधल्या ब्रिजवर एका महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला. या महिलेचं नाव रेश्मा बेगम (26) आहे. याबाबत स्टेशन अधीक्षकांनी सरकारी रुग्णवाहीकेच्या 108 क्रमांकावर संपर्क करून डॉक्टरांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या डॉक्टरांनी तिची सुखरूप सुटका केली. सध्या रेश्मा हिला पुढील उपचारासाठी वसई विरार महानगरपालिकेच्या रुग्णालयात दखल करण्यात आलं आहे.

रेल्वेच्या ब्रिजवर प्रसुती

नालासोपारा पश्चिम येथील हनुमान नगर येथे राहणारी रेश्मा बेगम ही महिला गोरेगाव येथे जाण्यासाठी निघाली होती. दरम्यान रेल्वे स्थानकाच्या मधल्या ब्रिजवर पोहचताच तिला प्रसुती कळा सुरू झाल्या. रविवारी 9.15 वाजण्याच्या सुमारास तिने या रेल्वेच्या ब्रिजवरच एका गोंडस बाळाला जन्म दिला.
नालासोपारा स्थानकाचे अधीक्षक रामकेश मीना यांना याबाबत समजताच त्यांनी 108 या क्रमांकावर फोन केला. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या डॉक्टरांनी रेल्वे सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने महिलेची प्रसूती केली.

दोघांची प्रकृती स्थिर

सध्या महिला आणि तिच्या बाळाला पुढील उपचारासाठी वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या रुग्णालयात हलवण्यात आलं असून दोघांची प्रकृती स्थीर असल्याचं समजते.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा