Advertisement

हार्बर रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत, प्रवासी त्रस्त

कॉटन ग्रीन स्टेशनजवळ सोमवारी सकाळी ओव्हरहेड वायर तुटल्याने छत्रपती शिवाजीमहाराज टर्मिनसकडे (सीएसटीएस) जाणाऱ्या लोकल गाड्यांचा खोळंबा झाला. यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांची मात्र एकच तारांबळ उडाली.

हार्बर रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत, प्रवासी त्रस्त
SHARES

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ऐन गर्दीच्या वेळी हार्बर रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना पुन्हा एकदा मनस्तापाला सामोरे जावं लागलं आहे. सोमवारी सकाळी कॉटन ग्रीन स्टेशनजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर रेल्वेवरील वाहतूक तब्बल दोन तास ठप्प झाली. 

प्रवासी त्रस्त

कॉटन ग्रीन स्टेशनजवळ सोमवारी सकाळी ओव्हरहेड वायर तुटल्याने छत्रपती शिवाजीमहाराज टर्मिनसकडे (सीएसटीएस) जाणाऱ्या लोकल गाड्यांचा खोळंबा झाला. यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांची मात्र एकच तारांबळ उडाली.

वाहतूक एक तास ठप्प

रेल्वेचं पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर तब्बल एक तासानंतर रेल्वे सेवा पूर्ववत झाली. जवळपास तासाभरापर्यंत हार्बर रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. याशिवाय अंधेरी-पनवेलकडे दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्यांची वाहतूकही १५ मिनिटे उशिराने सुरू होत्या.
यामुळे प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय झाली. सकाळी कामानिमित्ताने घराबाहेर पडलेल्या प्रवाशांना या लोकलच्या बिघाडामुळे कामावर पोहोचण्यासही उशीर झाला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा