मुंबईत लवकरच धावणार हायब्रिड लोकल

रेल्वेनं हायब्रीड लोकलची चाचपणी सुरू केलीय. हायब्रीड लोकल ट्रेन पश्चिम आणि मध्य रेल्वेवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. रेल्वे विभागानं एसी लोकल सुरू करण्याच्या दिशेनं काम सुरू केलंय. तसंच या हायब्रीड मॉडेलला कार्यात्मक बनवलंय. त्यामुळे लोकल एसी आणि नॉन एसी दोन्ही प्रकारात धावणार आहे.

पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक आलोक कन्सल म्हणाले की, हायब्रीड लोकलसंदर्भात आम्ही एक सर्व्हे केलेला होता, त्या सर्व्हेमध्ये ७० टक्के लोकांनी याला पसंती दर्शवली होती. त्यानुसार येत्या दोन ते तीन वर्षांमध्ये आम्ही हायब्रीड लोकल सेवा देणार आहोत. या हायब्रीड लोकल सेवेमध्ये आम्ही महिला सुरक्षेसंदर्भात विशेष काळजी घेणार आहोत आणि प्रत्येक डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा बसवणार आहोत. या हायब्रीड लोकलमध्ये फर्स्टक्लासचा डब्बा नसणार आहे.

प्रत्येक डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा बसवण्यात येणार आहेत. या हायब्रीड लोकलमध्ये फर्स्टक्लासचा डब्बा नसणार आहे. तसंच या हायब्रीड लोकल सेवेमध्ये महिला सुरक्षेसंदर्भात विशेष काळजी घेण्यात येणार आहे.

दुसरीकडे मुंबई मंडळानं वसई रोड-दिवा-पनवेलदरम्यान मेनलाईन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट सेवा बहाल करण्याचा निर्णय घेतलाय. मार्च २०२० मध्ये कोरोनामुळे सेवा बंद केली होती.

दरम्यान, मोदी सरकारचा महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्प सध्या चर्चेत आहे. बुलेट ट्रेन प्रकल्प हा कोणत्याही राज्याचा प्रकल्प नसून संपूर्ण देशाचा प्रकल्प आहे. त्यामुळे या प्रकल्पासंदर्भात जमीन अधिग्रहणाकरिता रेल्वे मंत्रालय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करत आहेत.

काही दिवसांपूर्वी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे मुंबईला आले असताना त्यांनी बुलेट ट्रेन जमीन अधिग्रहण प्रकरणासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची आणि रेल्वे अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली होती. त्याच बैठकीत हायब्रीड लोकलसंदर्भातही चर्चा झाल्याची माहिती पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक आलोक कन्सल यांनी दिली.


हेही वाचा

प्रवाशांचा रेल्वे प्रवास होणार आणखी सुकर, नव्या रेल्वे मार्गिका येणार सेवेत

मेट्रोचे 'हे' २ मार्ग डिसेंबरमध्ये होणार सुरु

पुढील बातमी
इतर बातम्या