२०२१ मध्ये मेट्रोचा दुसरा टप्पा मुंबईकरांच्या सेवेत

मेट्रोचा पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर लोकल्सवरचा ताण कमी झाला होता. आता दुसरा टप्पा सुरू झाल्यावर हा ताण आणखी कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतिक्षा सर्वांनाच आहे. अखेर MMRDAनं मेट्रोचा दुसरा टप्पा कधी सुरू करणार याची माहिती दिली आहे आणि ही नक्कीच प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे.

मेट्रोचा दुसरा टप्पा (Mumbai Metro 2nd Phase) मे २०२१ रोजी सुरू होणार आहे, अशी माहिती MMRDAचे आयुक्त आर ए राजीव यांनी दिली आहे. गुरूवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. ११ डिसेंबरला पहिली ट्रेन दाखल होणार आहे. तर एप्रिल महिन्यापर्यंत पर्यंत १० ट्रेन दाखल होतील. १४ जानेवारी २०२१ मकर सक्रांतीला मेट्रो ट्रायल सुरू होईल.

आर. ए. राजीव म्हणाले की, मेट्रोचं तिकीट दर कॅबिनेट बैठकीमध्ये ठरल्या प्रमाणेच राहणार आहेत. आरे’तील मेट्रो कारशेड पहाडी विभागात हलवणार का? या संदर्भात विधिमंडळात काय चर्चा झाली? या संदर्भात मी इथं बोलू शकत नाही.

इतके असतील दर

० ते ३ किलोमीटर – १० रुपये

३ ते १२ किलोमीटर – २० रुपये

१२ ते १८ किलोमीटर – ३० रुपये

१८ ते २४ किलोमीटर – ४० रुपये

२४ ते ३० किलोमीटर – ५० रुपये

मे २०२१ पर्यंत मेट्रोचा दूसरा टप्पा मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल. मेट्रो मार्ग 2 ए - दहिसर पश्चिम ते डिएन नगर आणि मार्ग 7 दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व असा आहे. कोविड संसर्गामुळे मेट्रोच्या कामाला उशीर होतोय. मनुष्यबळ उपलब्ध करताना अडचणी आल्या आहेत. मात्र सगळ्या अडचणींवर मात करून काम करण्यात येत आहे, अशी माहिती देखील त्यांनी दिली.


हेही वाचा

मागील ३ महिन्यात परराज्यातून २५ लाख प्रवासी मुंबईत दाखल

कोरोनाच्या काळात मुंबईतल्या मेट्रोचे काम वेगानं सुरू

पुढील बातमी
इतर बातम्या