Advertisement

मागील ३ महिन्यात परराज्यातून २५ लाख प्रवासी मुंबईत दाखल


मागील ३ महिन्यात परराज्यातून २५ लाख प्रवासी मुंबईत दाखल
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात लॉकडाऊन करण्यात आला. या लॉकडाऊनमुळं अनेकांचे रोजगार गेले.  त्यामुळं अनेकांनी आपल्या गावची वाट धरली. यामध्ये कामगार, मजूर वर्गाचाही समावेश असून, त्यांनीही श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला. परंतु, सध्यस्थितीत मुंबईत अनलॉक सुरू असून, तसंच लॉकडाऊनमध्ये शिथिल करण्यात आल्यानं आर्थिक राजधानी मुंबईच्या दिशेनं परराज्यातून येणाऱ्यांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. 

जून ते ऑगस्टपर्यंत या ३ महिन्यात सुमारे २५ लाख प्रवासी विशेष रेल्वे गाड्यामधून मुंबई महानगरात परतल्याची माहिती मध्य व पश्चिम रेल्वेकडून मिळाली. मध्य रेल्वेवरुन सर्वाधिक १६ लाख प्रवासी आल्याचं समजतं. मध्य रेल्वेने सीएसएमटी, एलटीटी, ठाणे, कल्याण येथून उत्तरेकडे व दक्षिणेकडे जाण्यासाठी १५ विशेष गाड्या सोडल्या. तेवढ्याच गाड्या मुंबईत येत आहेत. जून ते ऑगस्ट या ३ महिन्यांत एकूण १६ लाख ५० हजार जण दाखल झाल्याची माहिती देण्यात आली. 

गोरखपूर ते लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी), दरभंगा ते एलटीटी, गोरखपूर ते एलटीटी, वाराणसी ते सीएसएमटी, भुवनेश्वर ते सीएसएमटी, हैद्राबाद ते सीएसएमटी, बंगळुरू ते सीएसएमटी यासह अन्य भागातून गाडय़ा मुंबईत दर दिवशी दाखल होत आहेत. या गाड्याना मुंबईच्या दिशेने येण्यासाठी २०० ते ३०० प्रतिक्षा यादीही लागत असल्याचे सांगण्यात आले. पश्चिम रेल्वेवरील जोधपूर, अमृतसर, नवी दिल्ली, गोरखपूर, मुझफ्फरपूर इत्यादी विभागातून मुंबई सेन्ट्रल, वांद्रे टर्मिनसपर्यंत गाड्या दाखल झाल्या. जवळपास ९ लाख ४७ हजार ५६० प्रवासी दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई व परिसरातून सुटणाऱ्या गाड्याची संख्या अधिक होती. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाने जून महिन्यापासून सामान्य प्रवाशांसाठी विशेष रेल्वेगाड्या चालवण्यास सुरुवात के ली आणि श्रमिक गाड्याचे प्रमाण हळूहळू कमी होत गेले. त्यावेळी परराज्यात जाणाऱ्यांची संख्याही लाखोंच्या घरातच होती. परंतु जून महिन्यापासून टाळेबंदी शिथिल होण्यास सुरुवात झाली आणि आपले बिघडलेले अर्थचक्र  पुन्हा सुरळीत करण्यासाठी परराज्यात गेलेला मजूर, कामगार पुन्हा मुंबई महानगराकडे येऊ लागला आहे.

पश्चिम रेल्वेवरूनही जून महिन्यापासून सुरु झालेल्या विशेष रेल्वे गाड्यामधून मुंबई व परिसरातून ११ लाख २४ हजार ५३१ जण रवाना झाले.



हेही वाचा

मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी दोन महिन्यांवर

लढाई कोरोनाशी: घर ते शास्त्रीनगर रुग्णालय


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा