'या' कारणामुळं ५ दिवस शिर्डी विमानसेवा ठप्प

मुंबई ते शिर्डी विमानानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सध्या मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं आहे. कारण, शिर्डी विमानतळ परिसरातून धुकं हटत नसल्यानं मागील ५ दिवसांपासून विमानसेवा ठप्पच आहे. राज्याच्या विविध भागातुन साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांना त्याचा फटका बसतो आहे. मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, बेंगळुरू, कोलकाता, इंदूर या शहरांतून रोज २८ विमानांमधून प्रवासी येत असतात.

धुक्याचा मुक्काम

शिर्डी विमानतळावर मागील गुरुवारपासून धुक्याचा मुक्काम वाढल्यानं त्याचा फटका १० हजार प्रवाशांना बसला आहे. शिर्डीतच सातत्यानं हवामान खराब का होतं. याबाबत विमानतळ आणि विमान कंपन्याच्या अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

हवामान स्वच्छ

विमानतळाच्या किमान ५ किलोमीटर परिसरात हवामान स्वच्छ असेल, तरच विमानांना उतरण्यास आणि उड्डाणास परवानगी दिली जाते. मागील ५ दिवसांपासून दृश्यमानता ३ ते ३.३० किलोमीटरच्या पुढे सरकत नसल्यानं सेवा ठप्प झाली आहे.


हेही वाचा -

पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी मॉलकडे वाहनतळाची मागणी

देशाची आर्थिक राजधानी नशेच्या विळख्यात, १९ महिन्यात १०७३ जणांना अटक


पुढील बातमी
इतर बातम्या