Advertisement

देशाची आर्थिक राजधानी नशेच्या विळख्यात, १९ महिन्यात १०७३ जणांना अटक

१ जानेवारी ते ३० सप्टेंबर २०१९ या कालावधीत ६४ कोटी ६४ लाख ६२ हजार ३५२ रुपये किंमतीचे १६९ किलो ४१५० ग्रॅम १२८२ मिली ग्रॅम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले.

देशाची आर्थिक राजधानी नशेच्या विळख्यात, १९ महिन्यात १०७३ जणांना अटक
SHARES
Advertisement

देशाची आर्थिक राजधानी सध्या नेशेच्या विळख्यात अडकल्याचे पून्हा एकदा पुढे आले आहे. मुंबई पोलिसांनी मागील १९ महिन्यात विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत शहरातून तब्बल १०८९ कोटीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल १०७३ जणांना आतापर्यंत अटक केली असल्याचे माहिती अधिकारातून मागवलेल्या माहीतून पुढे आले आहे. वरील आकडेवारी पाहता नशेच्या विळख्यात अडकलेल्या मुंबईला सोडवण्यात पोलिसांना अपयश येत असल्याचे दिसून येते.  

मुंबई पोलिसांनी मागील काही महिन्यात मुंबईआणि जवळील शहरातून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची छुप्या पद्धतीने निर्मिती करणार्या कारखान्यांवर छापेमारी केली. या कारवाईत पोलिसांनी कोट्यावधी रुपयांचा ड्रग्जचा साठा ही जप्त केला. मात्र तस्करांनी वापरलेल्या नव्या क्लुप्यापाहून पोलिस ही आता चक्रावले आहेत. त्यामुळे अंमली पदार्थांची होणारी तस्करी दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत हेरॉईन, चरस, कोकेन, गांजा, एमडी, एलसीडी हे पदार्थ १३६३ किलो ३२४१ ग्रॅम १३६४ मिली ग्रॅम जप्त केले आहेत. हस्तगत केलेल्या या मुद्देमालाची किंमत १०१६ कोटी ३२ लाख ५६ हजार रुपये असून यामध्ये एकूण ३९५ आरोपींना अटक झाली होती. यामधील सर्वाधिक आरोपी गांजाचे सेवन करत असून त्यांची संख्या १९४ आहे.

१ जानेवारी ते ३० सप्टेंबर २०१९ या कालावधीत ६४ कोटी ६४ लाख ६२ हजार ३५२ रुपये किंमतीचे १६९ किलो ४१५० ग्रॅम १२८२ मिली ग्रॅम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. यंदा आरोपींच्या संख्येत दुप्पट वाढ झाली असून, एकूण ६७८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही आकडेवारी पाहता मुंबईला नशेच्या विळख्याने कशा प्रकारे घेरले आहे. याचा अंदाज न लावलेलाच बरा.

संबंधित विषय
Advertisement