Advertisement

पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी मॉलकडे वाहनतळाची मागणी

मुंबईत वाहनांची वाढलेली संख्या आणि त्यामुळं वाहनचालकांची पार्किंगसाठी होणारी गैरसोय लक्षात घेता मॉलमधील वाहनतळ सर्व वाहनांसाठी खुले करण्यात येणार आहे.

पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी मॉलकडे वाहनतळाची मागणी
SHARES

मुंबईत वाहनांची वाढलेली संख्या आणि त्यामुळं वाहनचालकांची पार्किंगसाठी होणारी गैरसोय लक्षात घेता मॉलमधील वाहनतळ सर्व वाहनांसाठी खुले करण्यात येणार आहे. मुंबईतील १३ मॉलमधील वाहनतळ बाहेरील वाहनांसाठी खुले करण्याचा निर्णय मुंबई वाहनतळ प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सोमवार ते शुक्रवार मॉलमधील वाहनतळ अशा वाहनांना पार्किंगसाठी वापरता येणार आहेत. त्यावेळी मॉलच्या परिसरात वाहनं उभी करण्यास मनाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


वाहनतळाची मागणी

मुंबईतील वाहनतळांच्या कमतरतेचा प्रश्न सोडविण्यासाठी मॉलकडे वाहनतळाची मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. सोमवार ते शुक्रवार दिवसा आणि रोज रात्री मॉलच्या वाहनतळावर खासगी वाहने उभी करता येणार आहेत. मात्र हे वाहनतळ सशुल्क असणार आहेत. आतापर्यंत २ मॉलनी शुल्क कमी करण्याची तयारी दर्शवली आहे. इतर ठिकाणीही शुल्क कमी व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.


वाहनांची नोंद जास्त

सध्यस्थितीत २४ लाख दुचाकी आणि १२ लाख चारचाकी वाहनांची नोंद प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडं आहे. वाहनांच्या संख्या जास्त असल्यानं त्या तुलनेत मुंबईतील वाहनतळ कमी आहेत. मात्र, जास्तीत जास्त वाहनांना वाहनतळ उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात महापालिका आहे. त्यामुळं रस्ते पादचाऱ्यांसाठी आणि वाहतुकीसाठी मोकळे होऊ शकणार आहेत. मॉलपासून १०० मीटर अंतरापर्यंत वाहनं उभी केल्यास वाहनचालकावर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.


या मॉलमध्ये वाहनतळ

स्टार मॉल (दादर), नक्षत्र मॉल(दादर), सीआर २ मॉल(नरिमन पॉइंट), सिटी सेंटर मॉल(नागपाडा), अट्रिया मॉल( वरळी), पॅलेडियम मॉल (परळ), के. स्टार मॉल (चेंबूर), आर. सिटी मॉल(घाटकोपर), इन्फिनिटी मॉल( अंधेरी पश्चिम), डी-मार्ट शॉपिंग(मुलुंड), ओबेरॉय मॉल( गोरेगाव), मार्क्‍स अ‍ॅन्ड स्पेन्सर( वांद्रे ), हब मॉल(गोरेगाव).



हेही वाचा -

रुळांवर चाकांचं घर्षण थांबविण्यासाठी मध्य रेल्वेनं आणली 'ही' नवी यंत्रणा

इक्बाल मिर्ची घराचा आज लिलावा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा