मुंबई सेट्रल स्थानकाचं नाव 'नाना शंकरशेठ' होणार

पश्चिम रेल्वेवर रेल्वेनं (Western Railway) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना (Passenger) आता लवकरच 'पुढील स्टेशन नाना शकरशेठ...', 'अगला स्टेशन नाना शकरशेठ...', 'नेक्स्ट स्टेशन नाना शंकरशेठ स्टेशन...’ असं ऐकायला येणार आहे. कारण आता लवकरच मुंबई सेट्रल (Mumbai Central) या स्थानकाचं नाव 'नाना शंकरशेठ' होणार आहे. याआधी पश्चिम रेल्वे मार्गावरील एल्फिन्स्टन (Elphinstan) स्थानकाचं नाव प्रभादेवी स्थानक (Prabhadevi) करण्यात आलं होतं.

मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला नाना शंकरशेठ (Nana Shankar Sheth) यांचं नाव देण्यासाठी केंद्र सरकारकडं प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (State Cabinet Meeting) घेण्यात आला आहे. मुंबई ते ठाणे (Mumbai To Thane) ही देशातील पहिली रेल्वे सुरू करण्यात नाना शंकरशेठ यांचं मोठं योगदान होतं. त्यामुळं नाना शंकरशेठ यांचं नाव मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला देण्याची मागणी होत होती.

शिवसेनेसाठी (Shiv sena) तो मराठी (Marathi) अस्मितेचा विषय आहे. त्यामुळं याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकार (Central Government) आणि रेल्वे मंत्रालयाकडे (Ministry of Railways) पाठविण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला. केंद्र सरकारच्या मान्यतेनंतरच प्रत्यक्ष नामांतर करता येणार आहे. त्यामुळं आता तब्बल अनेक वर्षांपासून स्थानकाचं 'मुंबई सेट्रल' असलेलं नावं शंकरशेठ होणार आहे.


हेही वाचा -

Coronavirus Update: महाराष्ट्रातील कोरोना रुग्णाची संख्या १५ वर

राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने शिवसेनेचे चंद्रकांत खैरे भडकले


पुढील बातमी
इतर बातम्या