पावसाळ्यात प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 'परे' आणि 'मरे' सज्ज

पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे मार्गावरील स्थानकांवर सुरू असलेल्या पादचारी पुल आणि इतर कामांमुळं पावसाळ्यात स्थानकांवर प्रवाशांची गर्दी होऊन कोणतीही दुर्घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळं अशा प्रकारची कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी रेल्वे प्रशासनानं रेल्वे सुरक्षा दलाला सज्ज राहण्यास सांगितलं आहे. पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी एनडीआरएफकडून (राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक) मध्य रेल्वे सुरक्षा दलाच्या ६० जवानांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसंच, दोन्ही मार्गांवर महाराष्ट्र सुरक्षा दलाचे आणखी काही जवानही (एमएसएफ)तैनात करण्याचा निर्णय घेतला अाल्याची माहिती मिळते आहे.

आरपीएफच्या जवानांना प्रशिक्षण

सध्या पश्चिम व मध्य रेल्वेच्या उपनगरीय स्थानकात पादचारी पुलांची कामं सुरू असल्यानं अनेक पूल बंद करण्यात आले आहेत. त्यामुळं प्रवाशांना रेल्वे प्रवासादरम्यान मोठ्या त्रासाला सामोर जावं लागतं आहे. पूल बंद असल्यानं पर्यायी पूलांवर प्रवाशांची गर्दी असल्यानं लोकल पकडण्यात काही प्रवाशांना अडचणीता सामना करावा लागतो आहे. मात्र, पावसाळ्यात देखील ही कामं सुरू राहणार असल्यामुळं कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसंच, रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना परिस्थिती हाताळता यावी यासाठी त्यांना ‘एनडीआरएफ’कडूनच प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

१५ जणांचा ४ पथकं

आपत्कालीन परिस्थिती हाताळणं, गर्दीवरील नियंत्रण, वैद्याकीय उपचारासह अन्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. १५ जणांचं एक याप्रमाणं ४ पथकं तयार केली जाणार असून, सीएसएमटी, दादर, कुर्ला आणि कल्याण स्थानकांवर त्यांना तैनात केलं जाणार आहे.


हेही वाचा -

'थकीत बिल द्या, अन्यथा वीजपुरवठा बंद करू', टाटा पॉवर कंपनीचा बेस्टला इशारा

पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश: अध्यादेशाचा मार्ग मोकळा


पुढील बातमी
इतर बातम्या