Advertisement

'थकीत बिल द्या, अन्यथा वीजपुरवठा बंद करू', टाटा पॉवर कंपनीचा बेस्टला इशारा

बेस्टच्या वीज उपक्रमानं वीजपुरवठा करणाऱ्या टाटा पॉवर कंपनीचे ५ महिन्यांचं बिल थकविलं आहे.

'थकीत बिल द्या, अन्यथा वीजपुरवठा बंद करू', टाटा पॉवर कंपनीचा बेस्टला इशारा
SHARES

आर्थिक तोट्यात अडकलेल्या बेस्टच्या चिंतेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, बेस्टच्या वीज उपक्रमानं वीजपुरवठा करणाऱ्या टाटा पॉवर कंपनीचे ५ महिन्यांचं बिल थकविलं आहे. टाटा कंपनीकडून बेस्ट वीज उपक्रमास वीजपुरवठा केला जातो. मात्र या पुरवठ्यासाठी दर महिन्याचं बिल भरणं अपेक्षित असतं. परंतु, डिसेंबर २०१८ ते एप्रिल २०१९ पर्यंतची सुमारे ५६१ कोटी रुपयांची वीज बिलाची थकबाकी न भरल्यानं 'ही रक्कम तातडीने भरावी, अन्यथा २१ मेपासून वीजपुरवठा खंडित करण्याचा' इशारा टाटा कंपनीनं बेस्टला दिला आहे.


बेस्ट प्रशासनाला पत्र 

बेस्ट उपक्रमाला टाटा पॉवरकडून वीज देण्यात येते. शहरात वीजपुरवठा करण्याचा अधिकार बेस्टकडं आहे. त्यामुळं टाटा पॉवरकडून वीज घेऊन ग्राहकांना विजेचा पुरवठा करण्याचं काम बेस्टद्वारे केलं जातं. त्यासाठी बेस्टला टाटा पॉवरला महिन्याला विजेची रक्कम भरायची असते. मात्र, डिसेंबर १८ आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या ५ महिन्यांची सुमारे ५६१ कोटी ५८ लाख रुपये इतकी रक्कम भरली नसल्यामुळं टाटा पॉवरनं बेस्ट प्रशासनाला पत्र पाठविलं आहे. त्यामुळं ऐन उन्हळ्याच्या दिवसांत वीज गुल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे


२१ मेपासून वीजपुरवठा बंद

दर महिन्याला रक्कम अदा करताना होणाऱ्या लेटमार्कमुळे टाटा पॉवरने पत्रात नाराजीदेखील व्यक्त केलेली आहे. तसेच ही थकबाकी लवकरात लवकर भरली नाही तर येत्या २१ मेपासून वीजपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला आहे. त्याचप्रमाणं बेस्टला देण्यात येणारी वीज दुसऱ्या कोणत्याही वितरकाला देण्यात येईल असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे.


थकबाकीची आकडेवारी

बिलाचा महिना
रक्कम (कोटींमध्ये)
डिसेंबर १८
११२.२४
जानेवारी १९
८८.०६
फेब्रुवारी १९
१०८.४७
मार्च १९
१०६.०९
एप्रिल १९
१३५.९०
एकूण
५६१.५८



हेही वाचा -

एसटीची वर्ग १ आणि २ अधिकारी पदासाठी परीक्षा आजपासून

'महामोर्चात हजारोंच्या संख्येनं सहभागी व्हा' - राज ठाकरे



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा