Advertisement

'महामोर्चात हजारोंच्या संख्येनं सहभागी व्हा' - राज ठाकरे

ठाणे महापालिकेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीन शुक्रवारी निघणाऱ्या महामोर्चात हजारोंच्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी पत्रकाद्वारे केलं.

'महामोर्चात हजारोंच्या संख्येनं सहभागी व्हा' - राज ठाकरे
SHARES

ठाणे महापालिकेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीन शुक्रवारी निघणाऱ्या महामोर्चात हजारोंच्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी पत्रकाद्वारे केलं. केवळ ठाणे नव्हेच राज्यातील सर्व शहरांमध्ये शेतकऱ्यांसाठी केवळ जागाच नव्हे, तर इतरही सुविधा मिळवून देण्यासाठी मनसे प्रशासनाला भाग पाडणार आहे. बाकी प्रश्नांवर राज्यस्तरावर जे काही करायचे, ते करीनच. तूर्तास याविरुद्ध आपण सर्वांनी आवाज उठवला पाहिजे, असं राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे.


दुर्लक्ष करणं योग्य

'शेतकऱ्यांची सध्याची अवस्था जर सरकारचा एक घटक असणाऱ्या लोकप्रतिनिधींना समजत नसेल, तर त्यांना ताळ्यावर आणणं गरजेचं आहे. केवळ एक शेतकरी आहे म्हणून ही घटना दुर्लक्ष करणं योग्य नाही, तर ही एक प्रातिनिधिक घटना आहे, असं समजून त्यांना उत्तर देणं गरजेचं आहे, म्हणूनच शुक्रवारी महापालिकेवर मोर्चा निघत आहे’, असं देखील राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे.

माल विकण्यासाठी सहकार्य

शेतकऱ्यांनी एकट्याने असो किंवा सामूहिकपणे त्यानं उत्पादित केलेला माल विकण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केलं पाहिजे. त्यासाठी शहरातील सरकारी कार्यालयं, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी जागा मिळवून दिली पाहिजे, असं देखील राज यांनी या पत्रात म्हटलं आहे. शेतकरी बाजारपेठांना मनसेचे कार्यकर्ते सर्वतोपरी मदत करत असताना केवळ श्रेय मिळू नये, यासाठी भाजपाचे पदाधिकारी हे गुंडांकडून अशावेळी प्रशासनावर दबाव आणून शेतकºयांना हुसकावून लावण्याचे प्रयत्न करत असल्याचा, असा आरोप राज ठाकरे यांनी या पत्रात केला आहे.



हेही वाचा -

मुंबई महापालिकेकडून बेस्टला मिळणार दरमहा १०० कोटी



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा