प्रवाशांना दिवाळी भेट, प्रगती एक्स्प्रेसमध्ये 'उत्कृष्ट रेक'

मध्य रेल्वेच्या मुंबई-पुणे मार्गावर प्रगती एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर आहे. कारण 'उत्कृष्ट रेक' प्रकल्पांतर्गत प्रगती एक्स्प्रेसच्या डब्यांमध्ये आधुनिक बदल करण्यात आले आहेत. ही एक्स्प्रेस रविवारपासून प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल झाली आहे.

काय आहेत बदल?

प्रगती एक्स्प्रेसमध्ये स्वच्छता राखण्यासाठी शौचालयामध्ये सिरामिक टाईल्स बसविण्यात आल्या आहेत. हवा खेळती राहाण्यासाठी खास पद्धतीने खिडक्या तयार करण्यात आल्या असून नवीन पंखेही बसवण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळी डब्यात उजेड राहण्यासाठी एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. एसी कोचमधील प्रवाशांना माहिती मिळण्यासाठी डिस्प्ले बसविण्यात आले आहेत. प्रत्येक डबा आकर्षक रंगसंगतीद्वारे सजविण्यात आला आहे.

रेल्वे बोर्डाची परवानगी

रेल्वे गाड्यांच्या डब्यांची रचना बदलणं तसंच डब्यांमध्ये अनेक नवीन सुविधा सुरू करणं, डब्यांच्या अंतर्गत सजावट बदलण्यासाठी रेल्वे बोर्डानं परवानगी दिली आहे. त्यामुळं सध्या प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी गाड्यांच्या डब्यांमध्ये अनेक बदल करण्यात येत आहेत.


हेही वाचा-

'त्या' लोकलचे अंधेरी स्थानकातील थांबे रद्द !

मुंबई विमानतळाचं नाव झालं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ


पुढील बातमी
इतर बातम्या