Advertisement

'त्या' लोकलचे अंधेरी स्थानकातील थांबे रद्द !


'त्या' लोकलचे अंधेरी स्थानकातील थांबे रद्द !
SHARES

पश्चिम रेल्वे मार्गावर १ नोव्हेंबरपासून लोकल गाड्यांचे नवे वेळापत्रक लागू करण्यात आले. तसंच, या वेळापत्रकानुसार, जोगेश्वरी स्थानकातून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या ६ जलद गाड्यांचे थांबे रद्द करण्यात आले होते. मात्र, प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन या लोकल गाड्यांना जोगेश्वरी स्थानकात पुन्हा थांबे देण्यात आले आहेत. परंतु, 'त्या' ६ लोकल गाड्यांपैकी ४ लोकल गाड्यांचे अंधेरी स्थानकातील थांबे रद्द करण्यात आले आहेत.


प्रवाशांची गैरसोय

पश्चिम रेल्वे मार्गावर गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जादा लोकल गाड्या सोडण्यात आल्या आहेत. मात्र, मालाड, गोरेगाव स्थानकातून सुटणाऱ्या लोकल गाड्यांचे जोगेश्वरी स्थानकातील थांबे रद्द करण्यात आले. प्रवाशांची गैरसोय होत असल्याने प्रवाशांनी स्टेशन मास्तरकडे लेखी तक्रार नोंदवली. त्याचप्रमाणं स्थानिक लोकप्रतिनिधींनीही शुक्रवारी रेल्वे मंत्रालय व पश्चिम रेल्वेकडे याबाबत चर्चा करून प्रवाशांसाठी या लोकल गाड्यांना थांबे देण्यासाठी मागणी केली.


पुन्हा थांबे

दरम्यान, प्रवाशांची आणि लोकप्रतिनिधींनीची ही मागणी लक्षात घेऊन रद्द केलेल्या ६ लोकल गाड्यांना पुन्हा थांबे देण्यात आले आहेत. मात्र, या गाड्यांना थांबे दिल्यानंतर ६ पैकी ४ लोकल गाड्यांचे अंधेरी स्थानकातील थांबे रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळं या लोकल गाड्यांंनी अंधेरी स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.



हेही वाचा-

जोगेश्वरी स्थानकातील सहा लोकलचे थांबे रद्द, प्रवाशांचे हाल

बघा, 'हे' आहेत रेल्वेतील सराईत मोबाइल चोर!



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा