बघा, 'हे' आहेत रेल्वेतील सराईत मोबाइल चोर!

मुंबईच्या लोकलमधून दिवसाला ७० ते ७५ लाख नागरिक दररोज प्रवास करतात. लोकलमध्ये होणाऱ्या याच गर्दीचा फायदा घेऊन नागरिकांचे खिसे कापून महागडे मोबाइल चोरण्यात भुरटे चोर फोफावले होते.

बघा, 'हे' आहेत रेल्वेतील सराईत मोबाइल चोर!
SHARES

मुंबईच्या लोकलमध्ये वाढत्या मोबाइल चोरीच्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांनी आता कंबर कसली आहे.  रेल्वे पोलिसांना लोकलमध्ये चोरी करणऱ्या १६ मोबाइल चोरांपैकी ११ जणांना अटक करण्यात यश आले असून उर्वरित आरोपींचा माग पोलिस काढत आहेत. या आरोपींवर नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यांची संख्या लक्षात घेऊन, लोकलमध्ये होणारी मोबाइलची चोरी रोखण्यासाठी पोलिस आता या सराईत आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याच्या पवित्र्यात आहेत. 


पोलिसांची पळवाट

मुंबईच्या लोकलमधून दिवसाला ७० ते ७५ लाख नागरिक दररोज प्रवास करतात. लोकलमध्ये होणाऱ्या याच गर्दीचा फायदा घेऊन नागरिकांचे खिसे कापून महागडे मोबाइल चोरण्यात भुरटे चोर फोफावले होते. त्यामुळे दिवसाला मोबाइल चोरीचे पन्नासहून अधिक गुन्हे नोंदवले जात आहे. मात्र मिसिंगची तक्रार नोंदवून पोलिस यातून पळवाट काढत होते. 


जामीनावर अाल्यावरही चोऱ्या

कालांतराने या गुन्ह्यांकडे रेल्वे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रीत केल्यानंतर मोबाइल चोरीचे गुन्हे रितसर नोंदवण्यात येऊ लागले. यातील अनेक गुन्ह्यांत पोलिसांनी आरोपींना अटक देखील केली. मात्र हे आरोपी जामीनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा चोऱ्या करून लागल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली होती. 


१६ सराईत चोर

अखेर या भुरट्या चोरांचा कायमचा नायनाट करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसत १६ सराईत आरोपींची यादीच तयार केली. त्यातील अकरा जणांना अटक करण्यात यश आलं आहे. खातिफ शेख, रफिक पटेल, शकिल खलिल अहमद शेख, देवा भालेराव, सिद्धेश कक्कड, इम्रान अली मेहमूद अली सय्यद, अब्दुल वाहिद मकबूल मन्सुरी, सुरेश साळवी, महावीर वर्मा, आसिफ झाकिर मुल्तानी, साहिल अब्दुल कय्यूम सय्यद अशी या अटक आरोपींची नावे आहेत. 


१८३ जणांना अटक

वारंवार या आरोपींना अटक करून देखील पुन्हा ते जेलमधून जामीनावर बाहेर येत चोरीचा मार्ग अवलंबत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आलं आहे. या आरोपींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी रेल्वे पोलिस कलम १०४ अंतर्गत या सर्वांवर मकोका लावण्याच्या पवित्र्यात आहेत. रेल्वे पोलिसांनी उचललेल्या या पावलामुळे महिन्याभरातच मोबाइल चोरीच्या गुन्ह्यात कमालीची घट झाली आहे. मागील पाच महिन्यात ९६६ मोबाइल चोरीच्या गुन्ह्यांची नोंद झाली असून पोलिसांनी आतापर्यंत १८३ जणांना अटक केली आहे. त्यातील हे १६ आरोपी सराईत चोर आहेत. 



हेही वाचा - 

लाच घेणारा म्हाडाचा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

महिला डाॅक्टरची फसवणूक




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा