लाच घेणारा म्हाडाचा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

बुधवारी ३१ आॅक्टोबरला कंत्राटदाराकडून लाच घेताना अभियंत्याला एसीबीने कंत्राटदाराच्या तक्रारीवरून रंगेहाथ पकडलं तेही दुरूस्ती मंडळाच्या कार्यालयात. सध्या हा अभियंता एसबीच्या ताब्यात असून दुपारी उशीरापर्यंत एसीबीकडून चंदनवाडी कार्यालयात तपास सुरू होता.

लाच घेणारा म्हाडाचा अभियंता एसीबीच्या जाळ्यात
SHARES

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या सी-३ विभागातील कार्यकारी अभियंत्याला २० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विरोधी पथका (एसीबी)ने रंगेहाथ पकडलं आहे. म्हाडाच्या दुरूस्ती मंडळाच्या चंदनवाडी कार्यालयात लाच घेताना या अभियंत्याला एसीबीनं सापळा रचून अटक केली आहे. या अभियंत्याचं नाव सूर्यकांत देशमुख असं आहे. दुरूस्तीच्या कामाच्या कंत्राटाचं बिल अदा करण्यासाठी या अभियंत्याने तक्रारदार कंत्राटदाराकडून लाच मागितली होती.


किती रुपयांची लाच?

म्हाडाच्या एमएसएस लेन, सोनापूर परिसरातील सेस इमारतींच्या दुरूस्तीचं कंत्राट घेतलेल्या कंत्राटदाराच्या कामाच्या बिलाची रक्कम ८ लाख रुपये इतकी झाली. त्यानुसार या बिलाची रक्कम अदा करण्यासाठी दुरूस्ती मंडळाच्या सी-३ विभागातील या अभियंत्यानं मंगळवारी, ३० आॅक्टोबरला कंत्राटदाराकडे एकूण बिलाच्या २ टक्केप्रमाणे १६ हजार रुपये आणि व्हिजिलन्सचे ५ हजार रुपये अशी एकूण २१ हजार रुपयांची लाच मागितली. शेवटी तडजोड करत २० हजार रुपये घेण्याचं या अभियंत्यानं कबूल केलं.

त्याप्रमाणे बुधवारी ३१ आॅक्टोबरला कंत्राटदाराकडून लाच घेताना अभियंत्याला एसीबीने कंत्राटदाराच्या तक्रारीवरून रंगेहाथ पकडलं तेही दुरूस्ती मंडळाच्या कार्यालयात.


दुरूस्ती मंडळाकडून चौकशी

सध्या हा अभियंता एसबीच्या ताब्यात असून दुपारी उशीरापर्यंत एसीबीकडून चंदनवाडी कार्यालयात तपास सुरू होता. याविषयी दुरूस्ती मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारलं असता या प्रकरणाची दुरूस्ती मंडळाकडून चौकशी होईल, असं सांगण्यात आलं आहे. तर अभियंत्यावरही निलंबनाची कारवाईही होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.



हेही वाचा-

८० काेटींचा जीएसटी बुडवला, पुण्यातल्या व्यापाऱ्याला मुंबईत अटक

कपड्याचं माप घेतना महिला डॉक्टरचा विनयभंग



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा