Advertisement

कपड्याचं माप घेतना महिला डॉक्टरचा विनयभंग


कपड्याचं माप घेतना महिला डॉक्टरचा विनयभंग
SHARES

कपड्याचं माप घेताना महिला डॉक्टरसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी 44 वर्षाच्या टेलरला खार पोलिसांनी अटक केली आहे. हाफिज शेख असं या आरोपीचं नाव असून न्यायालयाने हाफिजला पोलिस कोठडी सुनावली आहे.


संपूर्ण प्रकार

खार येथील सोच या लेडिज शॉपमध्ये पीडित महिला ही खरेदीसाठी आली होती. कपड्याची खरेदी केल्यानंतर ती कुर्ता अल्टर करण्यासाठी तेथील टेलर गेली असता माप घेताना हाफिजने महिला डॉक्टरला चुकीचा स्पर्श करण्यास सुरुवात केली. महिलेने त्याला बजावूनही हाफिज पुन्हा पुन्हा तशाच पद्धतीने स्पर्श करू लागला.


हाफिजला पोलिस कोठडी

या घटनेनंतर महिला डॉक्टरने पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती देत पाचरण केलं. त्यानंतर घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी हाफिजला ताब्यात घेत, त्याच्यावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता हाफिजला पोलिस कोठडी सुनावली आहे.

संबंधित विषय
Advertisement