महिला डाॅक्टरची फसवणूक


महिला डाॅक्टरची फसवणूक
SHARES

बँकेतून बोलत असल्याचं सांगून नागरिकांना गंडवणाऱ्या सायबर चोरट्यांनी नुकतीच परळच्या केईएम रुग्णालयात काम करणाऱ्या एका महिला डाॅक्टरला गंडवलं आहे. या महिलेच्या बँकेतील खात्याची माहिती घेऊन या चोरट्यांनी तिला १९ हजार ५०० रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार नोंदवली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.


अशी झाली फसवणूक

अंधेरी परिसरात राहणारी ही महिला डाॅक्टर परळ येथील केईएम रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. २३ आॅक्टोबर रोजी दुपारी या महिलेला अनोळख्या नंबरहून फोन आला. त्यावेळी समोरील व्यक्तीने बँकेतून बोलत असल्याचं सांगून नवीन क्रेडिटकार्ड वेरिफिकेशन करायचे असल्याचं सांगितलं. त्यानुसार सत्याने महिलेच्या खात्याची इत्यंभूत माहिती विचारली. त्यानुसार महिलेनेही कोणतीही चौकशी न करता ती माहिती त्याला दिली. त्याचबरोबर अवघ्या काही मिनिटांत त्या महिलेच्या खात्यातून पैसे तीन टप्प्यात काढण्यात आले.


पोलिसांत केली तक्रार

काहीही न करता पैसे काढण्यात आल्याचं कळाल्यानंतर महिलेेने त्या नंबरवर पुन्हा फोन केला असता. तो फोन बंद येत होता. त्यानंतर तिने तातडीने बँकेत चौकशी केल्यानंतर बँक कधीही खात्यासंदर्भातील महत्त्वाच्या गोष्टी फोनवर घेत नसल्याचं सांगितल्यानंतर महिलेला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. तिने तातडीने भोईवाडा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार नोंदवली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा