नव्या मोटार वाहन कायद्याला तूर्तास स्थगिती- दिवाकर रावते

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना भरमसाठ दंडाची तरतूद असणाऱ्या केंद्र सरकारच्या नव्या मोटार वाहन दुरुस्ती कायद्याला सर्व स्तरातून विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या कायद्याला तूर्तास स्थगिती दिल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी दिली.

पत्राद्वारे मागणी

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पत्रकार परिषद घेऊन नवीन मोटार परिवहन कायद्याला राज्यात तूर्तास स्थगिती देत असल्याचं जाहीर केलं. नव्या कायद्याबाबत केंद्र सरकारसोबत पत्रव्यवहार करण्यात  आला असून वाढीव दंडाचा फेरविचार करण्याची विनंती केंद्र सरकारकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे. तसंच जोपर्यंत या मागणीवर केंद्रीय मंत्र्यांचं उत्तर येत नाही तोपर्यंत या कायद्याचा अध्यादेश राज्यात लागू होणार नाही. त्यामुळे राज्यात सध्या जुन्या कायद्याप्रमाणेच दंडवसूली केली जाईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

व्यक्तिश: विरोध

काही दिवसांपूर्वीच नव्या मोटार वाहन कायद्यान्वये वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यास आकारण्यात येणाऱ्या भरमसाठ आर्थिक दंडाला माझा व्यक्तिशः विरोध असल्याचं रावते म्हणाले होते. 

कायद्याचं समर्थन

तर, नव्या कायद्यातील दंडाची तरतूद सरकारी तिजोरी भरण्यासाठी नाही तर, वाहतुकीचे नियम न पाळल्याने होणाऱ्या रस्ते अपघातातील मृतांची संख्या रोखण्यासाठी करण्यात आल्याचं म्हणत केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी या कायद्याचं समर्थन केलं होतं.


हेही वाचा-

नव्या मोटार वाहन कायद्याला माझा विरोध- दिवाकर रावते

वाहन कायद्यातील दुरूस्ती अद्याप लागू नाही, २ दिवसांत अधिसूचना लागू होण्याची शक्यता


पुढील बातमी
इतर बातम्या