Advertisement

वाहन कायद्यातील दुरूस्ती अद्याप लागू नाही, २ दिवसांत अधिसूचना लागू होण्याची शक्यता


वाहन कायद्यातील दुरूस्ती अद्याप लागू नाही, २ दिवसांत अधिसूचना लागू होण्याची शक्यता
SHARES

देशात १ सप्टेंबरपासून वाहतुकीचे नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. या नियमांनुसार वाहतुकीचे नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसंच, या दंडाची रक्कम आधीच्या रकमेपेक्षा अधिक आहे. मात्र, अद्याप राज्यात वाहतुकीचे हे नवीन नियम लागू झालेले नाही. परंतु, २ दिवसांत त्याची अधिसुचना लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळं परिवहन अधिकारी वा वाहतूक पोलीस नव्या दरानं वसूली करत असतील तर ते नियमबाह्य ठरणार आहे. त्यामुळं वाहन चालकांना आणखी काही दिवस दिलासा मिळण्यची शक्यता आहे. 

केंद्र सरकारचा कायदा 

१ सप्टेंबरपासून केंद्र सरकारचा कायदा लागू झाला असला तरी, राज्यांना दंडाच्या रकमेबाबत निश्चिती करावी अशी मुभा आहे. त्यानुसार, परिवहन विभागानं विविध गुन्ह्यांमध्ये दंडाची रक्क्म किती असणार आहे, याचा प्रस्ताव विधी व न्यायविभागाकडं पाठविला आहे. त्याच्या अभिप्रायानंतर हा प्रस्ताव परिवहनमंत्री यांच्याकडं मंजूरीसाठी पाठविण्यात येणार आहेदंडाच्या नवीन रक्कम किती असेल हे परिवहन विभागाच्या सॉफ्टवेअरमध्ये अपलोड केल्यानंतर ई-दंड आकारणी सुरू होईल. अधिसुचनेनंतर लगेच दंड आकारणी सुरू होईल, अशी माहिती परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी दिली आहे. 

दंडाच्या रकमेत अधिक वाढ

वाहतुकीच्या नव्या नियमांनसुसार काही गुन्ह्यांमध्येच दंडाच्या रकमेत अधिक वाढ करण्यात आली आहे. सिग्नल तोडणं, हेल्मेट न घालणं या गुन्ह्यांच्या दंडाच्या रकमेत  मोठी वाढ करण्यात येणार आहे. तसंच, एक-दोन प्रकारच्या गुन्ह्यांमध्येच दंडाची रक्कम २५ हजार असणार असल्याची माहिती मिळते.



हेही वाचा -

Video: निसर्गाचा बळी देऊन विकास नको! आरेतील वृक्षतोडीविरोधात अमित ठाकरेंनी उठवला आवाज

मुसळधार पावसामुळं पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा