Advertisement

मुसळधार पावसामुळं पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबईसह उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मुसळधार पावसामुळं पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
SHARES

मुंबईसह उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पश्चिम रेल्वेवरील विरारजवळ रुळाला तडा गेल्यानं धीम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसंच तांत्रिक बिघाडामुळं वसई-विरारदरम्यानची जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. 

रेल्वे रुळाला तडा

मुसळधार पावसामुळं मध्य आणि हार्बर रेल्वे १० ते १५ मिनिटं उशिरानं धावत आहे. पावसातही पश्चिम रेल्वेची सेवा सुरळीत होती. मात्र, सकाळी विरारजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्यानं वेळापत्रक कोलमडलं आहे. पश्चिम रेल्वेच्या धीम्या मार्गावर विरारकडं जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

लोकल सेवा विस्कळीत 

चर्चगेट ते बोईसर दरम्यान धावणाऱ्या सर्व लोकल गाड्या १५ ते २० मिनिटे उशिरानं धावत आहेत. लोकल सेवा विस्कळीत झाल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसंच, तांत्रिक बिघाडामुळं वसई-विरारदरम्यान जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. चर्चगेट ते वसई दरम्यानची वाहतूक सुरळीत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. 


हेही वाचा -

गणेश मंडळांनी वीजप्रवाह बंद ठेवावा, समितीचं आवाहन

मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाची हजेरीRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा