गणेश मंडळांनी वीजप्रवाह बंद ठेवावा, समितीचं आवाहन

सर्व सार्वजानिक गणेशोत्सव मंडळानी मंडपातील विजप्रवाह व्यवस्थित आहे की नाही त्याची पाहणी करावी. तसंच, शक्य झाल्यास पाऊस सुरु असते वेळी विजप्रवाह बंद ठेवावा

SHARE

मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. ऐन गणेशोत्सवात मागील २४ तासांपासून पडत असलेल्या पावसामुळं गणेश मंडळांमध्ये पावसाचं पाणी शिरत आहे. त्यामुळं सर्व सार्वजानिक गणेशोत्सव मंडळानी मंडपातील विजप्रवाह व्यवस्थित आहे की नाही त्याची पाहणी करावी आणि शक्य झाल्यास पाऊस सुरु असते वेळी विजप्रवाह बंद ठेवावा, असं आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी केलं आहे.  

जोरदार पाऊस 

गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून मुंबईत जोरदार पाऊस कोसळत आङहे. या जोरदार पाऊसामुळं अनेक ठिकाणी मंडपात पाणी येण्याची शक्यता नाकरता येत नाही. त्यामुळं याची दक्षता घेऊन  सर्व गणेशोत्सव मंडळानी मंडपातील विजप्रवाह व्यवस्थित आहे की नाही त्याची पाहणी करावी. तसंच, शक्य झाल्यास पाऊस सुरु असते वेळी विजप्रवाह बंद ठेवण्याचं आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनं केलं आहे. 

मुंबईत मंगळवारी दीड दिवस मुक्कामासाठी आलेल्या बाप्पांच विसर्जन करण्यात आलं. त्यावेळी देखील मुसळधार पाऊस असल्यामुळं गणेशभक्तांनी ओलचिंब भिजून बाप्पाला निरोप दिला.  हेही वाचा -

गणेशोत्सव २०१९: दीड दिवासाच्या बाप्पाला गणेशभक्तांनी दिला नरोप

रेल्वे प्रवासात स्टंट केल्यास ५ वर्षांची शिक्षासंबंधित विषय
ताज्या बातम्या