रेल्वे प्रवासात स्टंट केल्यास ५ वर्षांची शिक्षा

रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना अनेकदा स्टंटबाजांच्या मोठ्या त्रासाला समाेरं जावं लागतं.

रेल्वे प्रवासात स्टंट केल्यास ५ वर्षांची शिक्षा
SHARES

रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना अनेकदा स्टंटबाजांच्या मोठ्या त्रासाला समाेरं जावं लागतं. लोकलच्या दरवाजाजवळ उभं राहून स्टंट करताना दुसऱ्या लोकलच्या खांबांना हात लावणं, प्लॅटफॉर्मवरील प्रवाशाला हातानं मारणं, प्लॅटफॉर्मवर पाय घासून जाताना पायानं अन्य प्रवाशाला स्पर्श करणं, लोकलचा दरवाजा ते खिडकी आणि पुन्हा दरवाजा असा स्टंट करणं किंवा गाडीच्या छतावर उभं राहणं इत्यादी स्टंट हे स्टंटबाज करतात. मात्र, त्यांच्या या स्टंटमुळं प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळं रेल्वे प्रवासात स्टंट करणाऱ्यांना ५ वर्षांची शिक्षा भोगावी लागेल, अशी घोषणा मध्य रेल्वे सुरक्षा दलानं केली आहे. ५ वर्षांच्या शिक्षेची तरतूद असलेल्या नवीन कलमानुसार सुरक्षा दलाकडून ही कारवाई करण्यात येणार आहे.

कलम १५३ची अंमलबजावणी

या स्टंटबाजांवर कारवाई करण्यासाठी मध्य रेल्वे सुरक्षा दलानं कलम १५३ची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या स्टंटबाजावर या कलमानुसार कारवाई करण्यात येणार असून त्यात तो दोषी ठरल्यास त्याला ५ वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

हार्बर रेल्वे मार्गावर वडाळा, जीटीबी नगर ते चुनाभट्टी, चेंबूर, गोवंडी, वाशी, तर मध्य रेल्वे मार्गावर कल्याण, डोंबिवली, मुंब्रा, दिवा, कांजुरमार्ग, भांडुप, मुलुंड, ठाणे या स्थानकांदरम्यान अनेक जण स्टंट करताना पाहायला मिळतात.


हेही वाचा -

मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाची हजेरीRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा