गणेशोत्सव २०१९: दीड दिवासाच्या बाप्पाला निरोप

'गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या' अशा घोषणा देत गणेशभक्तांनी दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप दिला.

SHARE

'गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या' अशा घोषणा देत गणेशभक्तांनी दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप दिला. भक्तिमय वातावरणात मुंबापुरीतल्या गिरगाव, दादर, जुहू आणि वेसावे या प्रमुख चौपाट्यांसह कृत्रिम व नैसर्गिक तलावांत भक्तांनी गणेश मूर्तींच विसर्जन केलं. त्यावेळी बाप्पाला निरोप देताना अनेक गणेशभक्तांचे डोळे पाणावलेले पाहायला मिळाले.

बाप्पाचं विसर्जन

पारंपारिक वाद्यांच्या तालावर नाचत दीड दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं. महापालिकेकडून विसर्जनासाठी आलेल्या गणेभक्तांची गैर सोय होऊ नये यासाठी सर्व सुविधा त्यांना पुरविण्यात आल्या होत्या. तसंच, बाप्पाच्या विसर्जनावेळी मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं गणेश भक्तांनी ओलचिंब भिजून बाप्पाला निरोप दिला.

९०९७ गणेश मूर्तींचं विसर्जन

मुंबईत संध्याकाळी ६ वाजेपर्यंत दीड दिवसांच्या ९०९७ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आलं. त्यापैकी २३४१ मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. तर रात्री नऊ वाजेपर्यंत सार्वजनिक ६०, घरगुती ३८५१० गणेश मूर्तीपैकी सार्वजनिक मंडळाच्या १६ मूर्तीचे कृतिम तलावात तर ९ हजार ६३३ गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. दरम्यान, महापालिकेने गणपती विसर्जनासाठी चोख व्यवस्था ठेवली होती.हेही वाचा -

मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाची हजेरीसंबंधित विषय
ताज्या बातम्या