Advertisement

नव्या मोटार वाहन कायद्याला माझा विरोध- दिवाकर रावते

नव्या मोटार वाहन कायद्यानुसार वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून वसुलण्यात येणारी भरमसाठ दंडवसुली अमान्य असल्याचं मत राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी सांगितलं.

नव्या मोटार वाहन कायद्याला माझा विरोध- दिवाकर रावते
SHARES

नव्या मोटार वाहन कायद्यानुसार वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून वसुलण्यात येणारी भरमसाठ दंडवसुली अमान्य असल्याचं मत राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी सांगितलं. सोबतच नवीन मोटार वाहन कायदा आणि नियम लागू करण्याचं राज्य सरकारला पूर्ण स्वातंत्र्य असल्याचंही ते म्हणाले.

 राज्य सरकारला मुभा

१ सप्टेंबरपासून केंद्र सरकारचा कायदा लागू झाला असला तरी, राज्यांना दंडाच्या रकमेबाबत निश्चिती करावी अशी मुभा आहे. त्यानुसार, परिवहन विभागानं विविध गुन्ह्यांमध्ये दंडाची रक्क्म किती असेल, याचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडं पाठविला आहे. त्यांच्या अभिप्रायानंतर हा प्रस्ताव परिवहनमंत्री यांच्याकडं मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. दंडाच्या नवीन रक्कम किती असेल हे परिवहन विभागाच्या सॉफ्टवेअरमध्ये अपलोड केल्यानंतर ई-दंड आकारणी सुरू होईल.

व्यक्तिश: विरोध

या दंडवसुलीविषयी सर्वसामान्यांकडून रोष व्यक्त केला जात असतानाच हा कायदा राज्यात लागू करण्याला परिवहन मंत्र्यांनीच विरोध केला आहे. नव्या मोटार वाहन कायद्यान्वये वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास आकारण्यात येणाऱ्या आर्थिक दंडाला माझा व्यक्तिशः विरोध आहे, असं रावते म्हणाले. परंतु या कायद्याच्या अंमलबजावणीचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य राज्य सरकारला आहे.हेही वाचा-

वाहन कायद्यातील दुरूस्ती अद्याप लागू नाही, २ दिवसांत अधिसूचना लागू होण्याची शक्यता

सीसीटीव्हीच्या मदतीने मुंबई, पुण्यातील ११०० हून गुन्ह्यांची उकलसंबंधित विषय
Advertisement