सीसीटीव्हीच्या मदतीने मुंबई, पुण्यातील ११०० हून गुन्ह्यांची उकल

मुंबई, पुणे आणि नागपूर अशा महत्त्वाच्या शहरांत ठिकठिकाणी ९ हजार ८०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. या कॅमेऱ्यांच्या मदतीने ११०० हून अधिक गुन्ह्यांची उकल करण्यात मदत झाली आहे.

सीसीटीव्हीच्या मदतीने मुंबई, पुण्यातील ११०० हून गुन्ह्यांची उकल
SHARES

सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी मुंबई, पुणे आणि नागपूर अशा महत्त्वाच्या शहरांत ठिकठिकाणी ९ हजार ८०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. या कॅमेऱ्यांच्या मदतीने ११०० हून अधिक गुन्ह्यांची उकल करण्यात मदत झाली आहे.

सीसीटीव्हीचा फायदा

मागील ५ वर्षांमध्ये राज्य सरकारने गुन्हा व गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी नेटवर्क यंत्रणा (Crime and criminal tracking and network system) तसंच सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीमुळे गुन्ह्यांसोबतच धार्मिक आणि सार्वजनिक उत्सव, मोर्चे, आंदोलन, अति महत्त्वांच्या व्यक्तींचे दौरे, निवडणुका इ. घटनांचं प्रभावी चित्रण करणं शक्य झालं आहे.

कारवाईत यश

सध्या मुंबईत १५१० ठिकाणी ५००० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून आणखी ५६२५ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसंच पुण्यात ४२५ ठिकाणी १२३४, तर नागपूरमध्ये ३६०० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. या कॅमेऱ्यांच्या मदतीने मुंबई-पुण्यातील २१०० गुन्ह्यांचा शोध घेण्यात मदत झाली. तर दोन्ही शहरांत मिळून एकूण ९७२ आरोपींना पकडण्यात मदत झाली आहे.

सीसीटीव्हीच्या मदतीने मुंबईतील वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या ७ लाख वाहनचालकांना ई-चलान पाठवून कारवाई करण्यात आली आहे. याचप्रमाणे पुण्यातील १४ लाख जणांविरोधात ई-चलान फाडण्यात आले आहेत.   हेही वाचा-

CSMT स्थानक जगात सर्वात आश्चर्यकारक!

ONGC आगीमुळे सीएनजी, पीएनजी गॅस पुरवठ्यावर परिणामसंबंधित विषय