Advertisement

ONGC आगीमुळे सीएनजी, पीएनजी गॅस पुरवठ्यावर परिणाम


ONGC आगीमुळे सीएनजी, पीएनजी गॅस पुरवठ्यावर परिणाम
SHARES

आॅइल अँड नॅचरल गॅस काॅर्पोरेशन (ONGC)च्या उरण येथील गॅस प्रोसेसिंग प्लांटला मंगळवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत ७ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये अग्निशमन दलातील २ जवानांचा समावेश असल्याचं समजत आहे. या आगीमुळे सीएनजी (CNG) आणि पीएनजी (PNG) गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम होणार असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. त्यामुळे कदाचित शहरात गॅसच्या तुटवड्यामुळे टॅक्सी, रिक्षा सेवेवर परिणाम होऊ शकतो.

ओएनजीसी प्लांटमध्ये आग लागल्याची वर्दी मिळताच ओएनजीसी, जेएनपीटी फायर ब्रिगेड, द्रोणागिरी, पनवेल आणि नेरुळ नेरूळ इथूनही अग्निशमन दलाच्या गाड्या मागवण्यात आल्या. प्लांटमध्ये अडकलेल्या कामगारांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आलं आहे.  

या प्लांटमधील सामग्रीही जुनी झाल्याने गॅस गळतीने इथं आग लागण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. आग लागल्याचं कळताच या प्लांटमधील गॅसची प्रोसेसिंग थांबवण्यात आली. तसंच गॅल पुरवठाही रोखण्यात आला आहे. ओएनजीसी प्लांटमधून मुंबईतील वडाळा येथील महानगर गॅस लिमिटेड (MGL)च्या सिटी गेट स्टेशन इथं हा गॅस आणला जातो. 

परंतु सद्यस्थितीत गॅसचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. ग्राहकांना पीएनजी गॅसचा पुरवठा सुरळीत चालू ठेवण्याचा कंपनीचा प्रयत्न असेल, असं महानगर गॅस कंपनीने म्हटलं आहे. 



हेही वाचा-

उरण ओएनजीसी प्लांटला भीषण आग, ७ जणांचा मृत्यू

सीएसएमटी स्थानकात बफरवर आदळली लोकल



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा