Advertisement

उरण ओएनजीसी प्लांटला भीषण आग, ७ जणांचा मृत्यू

नवी मुंबईतल्या उरण येथील ओएनजीसी गॅस प्रोसेसिंग प्लांटला लागलेल्या भीषण आगीत ७ जण मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

उरण ओएनजीसी प्लांटला भीषण आग, ७ जणांचा मृत्यू
SHARES

नवी मुंबईतल्या उरण येथील ओएनजीसी गॅस प्रोसेसिंग प्लांटला लागलेल्या भीषण आगीत ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास ही आग लागली असून, या आगीत ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांची नाव अद्याप समजलेली नाही. मात्र, यामध्ये २ अग्निशमन जवानांचा समावेश असल्याचं समजतं. या भिषण आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे जावन घटनास्थळी दाखल झाले आहेत. शर्तीचे प्रयत्न करत त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. ओएनजीसीने ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.

लिक्विड गळतीमुळं आग

मंगळावारी सकाळच्या सुमारास आग लागली आहे. लिक्विड गळतीमुळं ही आग लागल्याचं समजतं. या प्लांटमध्ये आणखीही काही लोक अडकून पडल्याची भीती आहे. गंभीर जखमी झालेल्या कामगारांना उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या आगीमुळे परिसरात घबराट पसरली असून आजूबाजूला असलेल्या वसाहतींमधील रहिवासी सुरक्षित स्थळी जाऊ लागले आहेत.

अनेक कामगार जखमी

या आगीची माहिती मिळताच, ओएनजीसी, जेएनपीटी फायर ब्रिगेड, तसेच द्रोणागिरी, पनवेल आणि नेरुळ नेरूळ इथूनही अग्निशमन दलाच्या गाड्या मागवण्यात आल्या आहेत. संततधार पावसामुळे आग आटोक्यात आणण्यात अडथळे येत आहेतअनेक कामगार जखमी झाले. मात्र, प्लांटमध्ये नेमके किती कामगार होते, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप मिळू शकलेली नाही



हेही वाचा -

दादरमध्ये २२ ठिकाणी ६१ 'नो पार्किंग' झोन

गणेशोत्सव २०१९: सार्वजनिक मंडळांत 'तंबाखू मुक्त जीवना'चा संदेश



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा