Advertisement

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना दणका, दंडाच्या रकमेत वाढ


वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना दणका, दंडाच्या रकमेत वाढ
SHARES

मुंबईसह देशभरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांना कंबर कसली आहे. विविध उपयायोंजनांचा वापर करून वाहतुकीचे नियमांच उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई केली जात आहे. मात्र, आता वाहतुकीचे नियम मोडल्यास चलकांकडून जबर दंड वसूल केला जाणार आहे. तसंच, तुरूंगावासाची शिक्षा देखील सुनावली जाणार आहे.  

विधेयकाला मान्यता

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे बहुप्रतिक्षीत मोटर वाहन संशोधन विधेयक २०१९ बुधवारी राज्यसभेत मंजूर झाले. राज्यसभेत या विधेयकावर चर्चा झाल्यानंतर मतदान झालं असून, १३ विरुद्ध १०८ मतांनी या विधेयकाला मान्यता मिळाली आहे. त्यामुळं आता वाहतूक नियम (Traffic rules) मोडणाऱ्या वाहनचालकांना चांगलाच झटका बसणार आहे.

शिक्षेची आणि दंडाची तरतुद

अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवणं, विना परवाना वाहतूक, धोकादायक पद्धतीनं वाहन चालवणं, दारु पिऊन गाडी चालवणं, वेगानं गाडी चालवणं, आणि निश्चित सीमेपेक्षा अधिक लोकांची वाहतूक करणं अशा अनेक गोष्टींसाठी कायद्यात शिक्षेची आणि दंडाची तरतुद करण्यात आली आहे.

नवे दंड आणि शिक्षा

मुलांसाठी :

या नव्या कायद्यात सेक्शन १९४-बी नुसार ४ वर्षांपेक्षा मोठ्या मुलांना कारमध्ये सीटबेल्ट तर दुचाकीवर हेल्मेट बंधनकारक असणार आहे. जर हे पाळले नाही तर वाहन मालकावर १ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली जाईल.

रिकॉल ऑफ व्हेईकल’ :

या कायद्यामुळं पर्यावरणाला हानी करणाऱ्या आणि प्रदुषणाची निश्चित मर्यादा ओलांडणाऱ्या गाड्यांना बाजारातून हटवण्याचं अधिकार सरकारला मिळाले आहेत.

थेट इंजिनिअर अथवा ठेकेदार दोषी :

या जून्या कायद्यात रोड निर्मितीतील दोषांमुळं अपघात झाल्यास दोषी ठेकेदार अथवा इंजिनिअरवर कारवाईची कोणतीही तरतुद नव्हती. मात्र, या नव्या कायद्यात यासाठी विशेष तरतुद आहे. यात ठेकेदाराला १ लाख रुपयांपर्यंत दंड केला जाऊ शकतो.

अल्पवयीन चालक :

लहान मुलांच्या हातात वाहन दिल्यास जुन्या कायद्यामध्ये १ हजार रुपयांच्या दंडाची तरतुद करण्यात आली होती. मात्र, नव्या कायद्यात हा दंड २५ हजार रुपये करण्यात आला आहे. त्याशिवाय, ३ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षाही ठेवण्यात आला आहे. या व्यतिरिक्त गुन्हा करणाऱ्या अल्पवयीन मुलावरही कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

हिट अँड रन’ :

धडक देऊन फरार झालेल्या वाहन चालकावर जुन्या कायद्यात पीडित जखमी असेल तर १२ हजार ५०० रुपयांचा दंड होता. तसंच, पीडिताचा मृत्यू झाला तर आरोपी वाहन चालकावर २५ हजार रुपयांच्या दंडाची तरतुद केली होती. मात्र, नव्या कायद्यानं या गुन्ह्यांना अनुक्रमे ५० हजार आणि २ लाख रुपये दंड ठेवण्यात आला आहे.

विना हेल्मेट :

दुचाकी चालकाकडं हेल्मेट नसल्यास जून्या कायद्यात १०० रुपयां दंडाची तरतुद होती. मात्र, आता १,००० रुपये दंड आकारला जाणार आहे.

विनाविमा वाहन :

जून्या कायद्यात विनाविमा वाहन चालवल्यास १०० रुपये दंडाची तरतुद होती. मात्र नव्या कायद्यात आता २,००० रुपये दंडांची तरतुद केली आहे.

वाहनांची सदोष बनावट :

वाहनाच्या सदोष बनावटीमुळे अपघात झाल्यास डिलरवर १ लाख रुपये आणि वाहन निर्माता कंपनीवर १०० कोटी रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

वेग मर्यादेचं उल्लंघन :

जून्या कायद्यात वेग मर्यादेचं उल्लंघन केल्यास ४०० रुपये दंडाची तुरतुद होती. मात्र, नव्या कायद्यात २ ते ४ हजार रुपये दंडांची तरतुद केली आहे.

ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह :

दारु पिऊन वाहन चालवल्यास २ हजार रुपयांऐवजी १०,००० रूपये दंड, तुरुंगवासाचीही शिक्षा सुनावली जाणार आहे.

सीट बेल्ट :

वाहन चालवताना सीट बेल्ट न घातल्यास १,००० रुपये दंड आकारला जाणार आहे. याआधी १०० रुपये दंड आकारले जात होते.

रॅश ड्रायव्हिंग :

वाहन चालवतेवेळी रॅश ड्रायव्हिंग केल्यास ५०० रुपयांऐवजी  ५,००० रुपये दंड आकारला जाणार आहे.

धोकादायक वाहतूक :

धोकादायक वाहतूक आढळल्यास १,००० रुपयांऐवजी ५,००० रुपये दंड ठोठावला जाणार आहे.



हेही वाचा -

पूल बंदीमुळं बाप्पांच्या अगमनात अडथळे येण्याची शक्यता

मी केवळ संघासाठी नव्हे देशासाठी खेळतो- रोहित शर्मा



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा