Advertisement

मी केवळ संघासाठी नव्हे देशासाठी खेळतो- रोहित शर्मा

भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार रोहित शर्मानं ट्विटरवर एक फोटो शेअर करत 'मी केवळ संघासाठी नव्हे तर देशासाठी खेळतो' असं लिहिलं आहे.

मी केवळ संघासाठी नव्हे देशासाठी खेळतो- रोहित शर्मा
SHARES

भारतीय क्रिकेट संघाला (Indian cricket team) वर्ल्ड कप २०१९ (world cup 2019) स्पर्धेतील उपांत्य फेरीतील न्यूझीलंड (New zealand) संघाकडून पराभव पत्करावा लागला होता. या पराभवानंतर संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit sharma) आणि कर्णधार विराट कोहली (virat kohli) यांच्यात मतभेद निर्माण झाल्याची चर्चा क्रिकेट (Cricket) वर्तुळात रंगली होती. तसंच, क्रिकेटप्रेमींमध्येही या चर्चेला उधाण आलं होतं. मात्र, रोहित शर्मासोबत मतभेद असल्याच्या बातम्यांचं कर्णधार विराट कोहलीनं खंडन केलं. परंतु, दुसऱ्याच दिवशी रोहितनं ट्विटरवर एक फोटो शेअर करत 'मी केवळ संघासाठी नव्हे तर देशासाठी खेळतो' असं लिहिलं आहे.

ट्विटला चाहत्यांचा पाठींबा

रोहित शर्मानं ट्विटरवर मैदानात फलंदाजीसाठी जात असतानाचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्यानं 'मी केवळ संघासाठी नव्हे तर देशासाठी खेळतो', असंही लिहिलं आहे. रोहितच्या या ट्विटवर चाहते देखील मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देत आहेत. रोहितने अचूक वक्तव्य केलं असून सर्वांना त्याचा अभिमान असल्याचं चाहत्यांनी म्हटलं आहे.

मतभेदाची चर्चा हास्यास्पद

काही दिवसांपूर्वी विराट कोहलीनं पत्रकार परिषदेत रोहितसोबतच्या मतभेदाची चर्चा ही हास्यास्पद असल्याचं म्हटलं होतं. तसंच, भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी देखील रोहित-विराट यांच्यात बिनसल्याच्या चर्चेत तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं होतं.



हेही वाचा -

विधानसभेसाठी शुक्रवारपासून शिवसेनेच्या 'माऊली संवाद' उपक्रमाला सुरूवात

मुंबईत पहिल्यांदाच होणार 'मड फेस्टिव्हल', अनुभवा मजा, मस्ती आणि गेम्सचा थरार



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा