Advertisement

मुंबईत पहिल्यांदाच होणार 'मड फेस्टिव्हल', अनुभवा मजा, मस्ती आणि गेम्सचा थरार

एका चिखल महोत्सवात सहभागी होण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. कारण मुंबईत पहिल्यांदाच मड बॅशचं आयोजन करण्यात आलं आहे.

मुंबईत पहिल्यांदाच होणार 'मड फेस्टिव्हल',  अनुभवा मजा, मस्ती आणि गेम्सचा थरार
SHARES

आपण आजवर खाद्य महोत्सव , नाट्य महोत्सव पहिला असेल. जास्तीत जास्त काय चित्रपट महोत्सव पहिला असेल पण आपण कधी 'चिखल महोत्सव' पाहिला आहे का ? नाही ना... मग अशाच एका चिखल महोत्सवात सहभागी होण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. कारण मुंबईत पहिल्यांदाच मड बॅशचं आयोजन करण्यात आलं आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर हा खेळ खेळला जतो असा गैरसमज आहे. आपल्या मातीशी नाळ जोडणारा, मातीच्या मायेची उब देणारा असा हा महोत्सव कोकणात अनेक वर्षांपासून खेळला जातो. मुंबईत या खेळाचं पहिल्यांदाच आयोजन करण्यात आलं आहे


मड बॅशची मजा

चिखलातील खेळ म्हटल्यावर तुमच्या कपाळाला आट्या पडल्या असतील. पण घाबरू नका. हा चिखल म्हणजे एक प्रकारचा मड असतो. जो शरीरासाठी धोकादायक नसतो. एकप्रकारे तो तुमच्या त्वचेसाठी चांगला आहे. मालाडमधील रोअरींग फार्ममध्ये या मड बॅशचं आयोजन केलं आहे.

तुम्ही या मड बॅशमध्ये कुटुंबियांसोबत सहभागी होऊ शकता. यासाठी तुम्हाला ५४० रुपये मोजावे लागतील. यासोबतच तुम्हाला वेगवेगळ्या सोयी-सुविधा मिळतील. वैद्यकीय सुविधा, जेवण-पाणी याशिवाय त्यांचे स्पेशल टी-शर्ट्स असं बरंच पॅकेजमध्ये तुम्हाला मिळेल.


गेम्सचा थरार

मडमध्ये खेळण्यात येणाऱ्या गेम्सचं देखील आयोजन इथं करण्यात आलं आहे. एटीव्ही राईड्स (बाईक राईड), मड फुटबॉल, किचड कबड्डी, मड पुल आणि रेन डान्स अशा गेम्सचं आयोजन करण्यात आलं आहे. पहिल्या दिवशी फक्त १८  वर्षावरील तरूणांना सहभागी होता येईल. तर दुसऱ्या दिवशी सर्व वयोगटातील इच्छुकांना सहभागी होण्याची संधी आहे.

तिकिट बुक करण्यासाठी : https://in.bookmyshow.com/activities/mud-bash-2019/ET00105902

कधी : ३ आणि ४ ऑगस्ट

कुठे : रोअरींग फार्म, पथारे वाडी, बगीचा स्वागत रेस्टॉरंटच्या समोर, मालवणी व्हिलेज, मालाड

दर : ५४०संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा